बेळगावात ‘मराठी’ सत्ता येणार का?

बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली असून ५८ जागांसाठी मतदान पार पडले. एकूण ३८५ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

74

तब्बल ८ वर्षांनंतर बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक पार पडली, त्यासाठी ३ सप्टेंबर रोजी मतदान पार पडले. सोमवारी, ६ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. सकाळी आठ वाजता या मतमोजणीला सुरुवात होईल. या निवडणुकीत पुन्हा एकदा मराठी भाषिकांची सत्ता येणार का, महाराष्ट्र एकीकरण समितीचे पारडे जण होणार कम, हे काही तासांतच स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत प्रथमच राष्ट्रीय पक्ष म्हणजे भाजप आणि काँग्रेस हे उतरले आहे.

३८५ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

बेळगाव महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी बीके मॉडेल हायस्कूल येथे होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. एकूण ५८ जागांसाठी मतदान पार पडले. त्याची मतमोजणी होणार आहे. एकूण ३८५ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत अधिकृत २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर भाजप ५५, काँग्रेस ४५, जेडीएस ११, आम आदमी ३७, एआयएमआयएम ७, अन्य दोन आणि अपक्ष २१७ उमेदवारांचे भवितव्य आज ठरेल. मात्र भाजप आणि काँग्रेस या दोन्ही मोठ्या राष्ट्रीय पक्षांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराचे मोठे आव्हान असेल. आजच्या मतमोजणीसाठी केंद्रात ५०० पोलिस तैनात करण्यात आलेत. तर मतमोजणी केंद्राच्या आवारात कलम १४४ जारी केला आहे. तर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडून नये यासाठी १५०० पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच प्रशासनाने मतमोजणी केंद्राच्या दिशेने जाणारे सर्व रस्त्यांवर बॅरिकेड्स लावले आहेत. दुपारी १२ वाजेपर्यंत निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा : अनिल देशमुखांना दिसता क्षणी अटक! अखेर कुणी दिले आदेश?)

महानगरपालिकेसमोर लाल पिवळा ध्वज लावण्याचा प्रयत्न

बेळगाव महानगरपालिकेसमोर काही दिवसांपूर्वी लाल पिवळा ध्वज लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. कन्नड रक्षण वेदिकेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले. लाल पिवळा ध्वज लावण्यावरून बेळगावमध्ये तणाव निर्माण झाला होता. अनधिकृत ध्वजावरुन गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात तणावाचे वातावरण होते. त्यामुळे या निवडणुकी एकप्रकारे मराठी अस्मिता पणाला लागली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.