बेळगाव महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत

बेळगाव महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा फडकविण्याचे स्वप्न मात्र भंगले आहे.

कर्नाटकासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून राहिलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. आतापर्यंत आलेल्या निकालानुसार भाजपने २९ आाकड्यांची मॅजिक फिगर ओलांडली आहे. भाजपने या निवडणुकीत आक्रमक प्रचार केला. दुसरीकडे बेळगाव महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा फडकविण्याचे स्वप्न मात्र भंगले आहे.

मतदानाचा टक्का घसरला!

या निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरल्यामुळे निकालाची उत्सुकता कमालीची ताणली गेली होती. आमचे ३० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अखेर भाजपने बेळगाव महापालिकेवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

एकूण ३८५ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात

बेळगाव महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी बीके मॉडेल हायस्कूल येथे होणार आहे. एकूण ५८ जागांसाठी मतदान पार पडले. त्याची मतमोजणी होणार आहे. एकूण ३८५ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत अधिकृत २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर भाजप ५५, काँग्रेस ४५, जेडीएस ११, आम आदमी ३७, एआयएमआयएम ७, अन्य दोन आणि अपक्ष २१७ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. मात्र भाजप आणि काँग्रेस या दोन्ही मोठ्या राष्ट्रीय पक्षांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराचे मोठे आव्हान होते, मात्र आव्हान संपुष्टात आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here