भाजप तसेच शिंदे गटाच्या संमिश्र युतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारमध्ये शपथ घेतलेल्या नूतन मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केले.
ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून ज्यांनी शपथ घेतली त्या सर्वांचे अभिनंदन. प्रशासकीय अनुभव आणि सुशासनाने कारभार करण्याचा ध्यास असलेल्या व्यक्ती याचे मिश्रण असलेली ही उत्तम टीम आहे. राज्याच्या जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना माझ्याकडून शुभेच्छा, असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
( हेही वाचा: “मी नाराज नाही…मुख्यमंत्र्यांवर माझा पूर्ण विश्वास” मंत्रिमंडळ विस्तारावर संजय शिरसाटांचे स्पष्टीकरण )
महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून आज ज्यांनी शपथ घेतली त्या सर्वांचे अभिनंदन. प्रशासकीय अनुभव आणि सुशासनाने कारभार करण्याचा ध्यास असलेल्या व्यक्ती यांचा मिलाफ असलेली ही उत्तम टीम आहे. राज्याच्या जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना माझ्याकडून शुभेच्छा.
— Narendra Modi (@narendramodi) August 9, 2022
अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार
राज्याच्या मंत्रिमंडळाचा अखेर मंगळवारी 9 जुलैला विस्तार झाला. जवळपास 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. मंगळवारी 11 वाजता राजभवनातील दरबार हाॅलमध्ये एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाचे नऊ तर भाजपकडून नऊ जणांचा शपथविधी पार पडला. या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.
Join Our WhatsApp Community