भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूह दिनदर्शिका सर्वांसाठी उपलब्ध

162

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जन्मभूमीत त्यांच्या विचारांचा वसा घेतलेल्या भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समुहाच्या वतीने नुकतेच ‘भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूह दिनदर्शिका २०२२’ चे प्रकाशन करण्यात आले. सद्यस्थितीतील कोरोनाची पार्श्वभूमी पाहता श्रीराम मंदिर परिसरात समूहातील अगदी मोजक्या सदस्यांसमवेत हा कार्यक्रम झाला. या दिनदर्शिकेच्या प्रकाशनाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विजय घोडेकर, प्रसाद आडके, शिरीष पाठक उपस्थित होते.

दिनदर्शिका नि:शुल्क उपलब्ध  

आपण आपल्या घरात, कार्यालयात वा संस्थेत लावतो अशा साधारण त्याच आकारातील ही दिनदर्शिका भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूह यांनी सर्वांसाठी अगदी नि:शुल्क उपलब्ध करून दिलेली आहे. या दिनदर्शिकेच्या प्रथम पृष्ठावर सावरकर बंधू यांचे निवासस्थान असलेल्या भगूर येथील स्वा. सावरकर स्मारक, तसेच द्वितीय पृष्ठावर भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूह, भगूर यांनी राबविलेले विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक स्पर्धेवर आधारित मार्गदर्शन शिबिर, भगूर दर्शन, अभ्यास मोहीम, शैक्षणिक सहलींना मार्गदर्शन तसेच सहकार्य, रक्तदान आणि आरोग्य शिबीर, स्वच्छता मोहीम तसेच अन्य उपक्रमांची यांत माहिती दिलेली आहे. या प्रकाशनाप्रसंगी भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाचे सदस्य प्रमोद आंबेकर, आकाश नेहरे, प्रसाद आडके, प्रशांत लोया, संभाजी देशमुख, गणेश राठोड, भूषण कापसे, मनोज कुवर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद आंबेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन मनोज कुवर यांनी केले.

(हेही वाचा घरोघरी वीर सावरकर! सलग ५० दिवसात १०,००० घरात ‘राष्ट्रसूर्य दिनदर्शिका’)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.