काँग्रेस (Congress) नेते भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून वादाला तोंड फुटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पलटवार केला आहे. याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले. भाई जगताप यांचे वक्तव्य म्हणजे निवडणूक आयोगाचा अवमान असल्याचे सांगून ते खपवून घेतले जाणार नसल्याचे सांगितले. तसेच काँग्रेस नेते भाई जगताप यांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करताना निवडणूक आयोगाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. आपला देश जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि जर कोणी ईव्हीएमवर शंका घेत असेल तर त्याचे उत्तर दिले पाहिजे असे किरीट सोमय्या म्हणाले. (Kirit Somaiya)
काय म्हणाले भाई जगताप?
“मी एकटा नाही. मी ४५-४७ वर्षे राजकारणात घालवली. महाराष्ट्रात असे निकाल लागलेले नाहीत. हा ईव्हीएमचा खेळ आहे, असे मी पूर्वीपासून म्हणत आलो आहे. आज नाही तर उद्या चर्चा व्हायला हवी. बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. लोकशाहीवर प्रश्न उपस्थित होत असतील तर सरकार आणि निवडणूक आयोगाने (Election Commission) उत्तर द्यावे. निवडणूक आयोग म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बंगल्याबाहेर बसलेला कुत्रा आहे,” असं भाई जगपात यांनी म्हटलं. त्यानंतर सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहीत तक्रार केली आहे.
I filled complaint with Election Commission & Police Commissioner Mumbai to take action against Congress Bhai Jagtap for abusing Election Commission
निवडणूक आयोगाल कुत्रा शिवी बद्दल काँग्रेस भाई जगताप वर कारवाई करण्यासाठी मी निवडणूक आयोग आणि पोलीस आयुक्तां कडे तक्रार केली आहे pic.twitter.com/TZpyfN4jLy
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 30, 2024
(हेही वाचा – Gujarat ATS: २०० रूपयांसाठी देशासोबत गद्दारी; पाकिस्तानी गुप्तहेराला गुजरातमधून अटक)
किरीट सोमय्या म्हणाले की “मी निवडणूक आयोगाला पत्र लिहून मुंबई पोलीस आयुक्तांकडे (Mumbai Police Commissioner) तक्रारही केली आहे. हा प्रकार, घटनात्मक संस्था असलेल्या निवडणूक आयोगाचा अपमान सहन केला जाणार नाही. भाई जगताप (Kirit Somaiya) यांच्यावर कारवाई करायला हवी. काँग्रेस निवडणूक आयोगाला लक्ष्य करत आहे कारण ते मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) निवडणुकीला घाबरत आहेत. गेल्या दोन दिवसांत, काँग्रेस, शिवसेना उबाठा गट असे सर्वजण ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाला लक्ष्य करत आहेत कारण सर्वजण मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना घाबरत आहेत,” असं सोमय्या म्हणाले.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community