हाती कमळ घेऊन स्त्री येते, तेव्हा हिंदुत्वामध्ये तिला महालक्ष्मी म्हणतात, कमळाबाई नाही. परंतु हिंदुत्वाशी फारकत घेतलेल्या पेंग्विन सेनेला हे कळणार कसे, असा सवाल करत भाजपाचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी ज्यांच्या हातून सर्वच गेलेले आहे, त्यांनी हातघाईचीवर बोलण्याची गरज नाही. त्यांना यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. भाजपाचे सरकार महालक्ष्मीच्या कृपेने हाती कमळ घेऊन अतिशय खंबीरपणे उभे असल्याचे सांगत त्यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातील टीकेला उत्तर दिले.
भाजपाचे सरकार महालक्ष्मीच्या कृपेने हाती कमळ घेऊन खंबीरपणे उभी
सामनामध्ये प्रसिध्द झालेल्या ‘कमळाबाई हातघाईवर’ या लेखाचा समाचार भाजपाचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी जाहीर पत्रकार परिषदेत घेतला. वसंतस्मृती येथील मुंबई भाजपाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना शिरसाट यांनी, ज्यांच्या हातातून सर्वच सुटत चालले. कॅबिनेट मंत्री गेले, राज्यमंत्री गेले, आमदार गेले, सत्ता गेली आणि साम्राज्यही गेली, त्यांनी हातघाईवर काय बोलावे, असे सांगत शिवसेना आमदार सचिन अहिर यांचाही समाचार घेतला. अहिर यांचे वरळीतील जांभोरी मैदान गेले, दहिहंडी गेली आता शिवाजी पार्क राहील की नाही, ही शंका आहे, ज्यांच्या हातून सर्वच गेल्यावर त्यांनी हातघाईवर बोलू नये. भाजपाचे सरकार महालक्ष्मीच्या कृपेने हाती कमळ घेऊन अतिशय खंबीरपणे उभी असल्याचे त्यांनी सांगितले.
(हेही वाचा Ganeshotsav 2022 मुंबईत अवजड वाहनांना प्रवेशबंदी)
शिवसेनेचा उल्लेख पेंग्विन सेना करायचा का?
आमच्यासोबत हिंदुत्ववादी शिवसेना सेना आहे. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे. मग उरलेल्या पेंग्विन सेनेला काय किंमत द्यायची असाही सवाल शिरसाट यांनी केला. मानखुर्दच्या पुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव न देता मोहम्मद चिस्ती या संताचे नाव देण्याचे प्रस्ताव आणला. भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार ऍड. आशिष शेलार यांनी शिवसेनेचा उल्लेख पेंग्विन सेना असा उल्लेख केला ते त्यांना झोंबले का, असा सवालही शिरसाट यांनी केला.
तापमान वाढले किंवा कमी झाल्यावर पेंग्विन चुळबूळ करतो. . .
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना शिरसाट यांनी, पेंग्विन हा परदेशी प्राणी आहे. ते भारतीय मातीतील नाहीत. भारतीय तापमान त्यांना सहन होत नाही, जेव्हा त्यांना तापमान सहन होत नाही, किंबहुना तापमान वाढते किंवा कमी होती तेव्हा ते चुळबूळ करू लागतात, असे सांगत यातच किशोरीताईंना काय ते कळले असेल, असे त्यांनी सांगितले. पेंग्विन पक्षी एकनिष्ठ असल्याचे पेडणेकर यांच्या दाखल्यावर बोलतांनाही शिरसाट यांनी पेंग्विन हा भारतीय प्राणी नसल्याने तो एकनिष्ठ आहे किंवा नाही. परदेशात मल्टीपल स्वातंत्र्य असते. ते जास्त लग्न करू शकतात आणि घटस्फोटही घेऊ शकतात. त्यामुळे पेंग्विनच्या पावलावर चालणारी शिवसेना ही पेंग्विनसारखीच एकनिष्ठ आहे, असेच त्यांना म्हणायचे असेल
शिवसेनेचा पक्ष किती राहतोय ते काळानुसारच कळेल
उध्दव ठाकरे यांनी ठाकरे सरकार आल्यानंतर हे सरकार पाच वर्षे नाही तर २५ वर्षे राहणार, असा दावा केला होता. पण त्यांचे सरकार अडीच वर्षात गेले. आता त्यांचा पक्ष किती राहतो? त्यांच्या पक्षाला काय मान्यता मिळते, हे काळानुसारच कळेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
शरद पवार म्हणजे ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. . .’
शरद पवार मोठे नेते, पण आज पवारांची अवस्था ही बेगानी शादीमे अब्दुल्ला दिवाना अशीच झाली असल्याचे शिरसाट यांनी म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री आमदार अशोक चव्हाण हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर पेंग्विन सेनेच्या पायाखालील वाळू सरकली असल्याचे सांगत शिरसाट यांनी कालाये तस्मे नम: असे म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community