Bhandara District Assembly : महागाई, शेती प्रश्नावरून आघाडी आक्रमक; युतीची मदार वैयक्तिक लाभाच्या योजनांवर

71
Bhandara District Assembly : महागाई, शेती प्रश्नावरून आघाडी आक्रमक; युतीची मदार वैयक्तिक लाभाच्या योजनांवर
  • प्रतिनिधी

भंडारा जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडी साकोली, तुमसर आणि भंडारा या तिनही मतदारसंघात मैदानात उतरली आहे. जनसामान्याचे गायब झालेले प्रश्न आता पुन्हा राजकीय प्रचाराच्या धुराळ्यात दिसणार आहेत. लोकसभेवेळी प्रचारात असलेले महागाई, बेरोजगारी, शेतीचे प्रश्न यासह अनेक मुद्दे याही वेळीही कायम आहेत. त्यावरून महाविकास आघाडी आक्रमक आहे, तर महायुतीची मदार निवडणुकीच्या तोंडावर जाहीर झालेल्या योजनावर दिसत आहे. तिनही विधानसभा मतदारसंघात तडाख्यात प्रचार सुरू झाला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांकडून कॉर्नर सभा तसेच नेत्यांच्या जाहीर सभा व्हायला लागल्या आहेत. १३ दिवस राहणाऱ्या या प्रचारकाळात पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या सभाही जिल्ह्यात होऊ घातल्या आहेत. (Bhandara District Assembly)

भंडारा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर आणि महाआघाडीकडून काँग्रेसच्या पूजा ठवकर हे उभे आहेत. अशातच उद्धवसेनेचे नरेंद्र पहाडे आणि काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांची काँग्रेसच्या ठवकर यांच्यासमोर बंडखोरी आहे. विधानसभेचे दोनवेळा आमदार राहिल्याने आमदार भोंडेकर यांना प्रशासनाचा भरपूर अभ्यास आहे. मागील दोन वर्षात मोठ्या प्रमाणावर निधीआणण्यात त्यांना यश आल्याने त्यांच्यासाठी ही जमेची बाजू मानली जात आहे. असे असले तरी पवनी तालुक्यात एमआयडीसी व मोठ्या प्रकल्पाची लोकांना प्रतीक्षा आहे. (Bhandara District Assembly)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election : मजुरांचे अड्डे ओस; कामासाठी मिळेनात मजूर)

भंडारा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे १९ उमेदवार रिंगणार आहेत. यात अपक्ष उमेदवारांची संख्या १० आहे. अखेरच्या दिवशी या मतदारसंघातून १२ उमेदवारांनी माघार घेतली असली तरी अपक्षांची मोठी डोकेदुखी सर्वच प्रमुख उमेदवारांपुढे राहणार आहे. या मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर, महाविकास आघाडीकडून अश्विनी लांडगे, बसपाचे बालक काँग्रेसच्या पूजा ठवकर, मनसेच्या गजभिये, वंचित बहुजन आघाडीचे अरुण गोंडाणे यांच्यासह अन्य पक्षाचे तसेच शिवसेना उबाठा गटातून बंडखोरी करणारे नरेंद्र पहाडे, काँग्रेसचे बंडखोर प्रेमसागर गणवीर रिंगणात आहेत. या दोन बंडखोरांनी महाआघाडीच्या पूजा ठवकर यांची अडचण वाढविल्याचे दिसत आहे. तर, महायुतीचे नरेंद्र भोंडेकर यांच्यापुढे एकाही बंडखोराचे आव्हान राहिलेले नाही. आकाराने मोठा असलेल्या या मतदारसंघात कमी दिवसात सर्वच मतदारांपर्यंत पोहोचण्याची कसरत उमेदवारांना करावी लागणार आहे. (Bhandara District Assembly)

तुमसर मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये नेत्यांनी बंडाचा झेंडा उभारला होता. १२ जणांची नावे पुढे आली होती. मात्र अंतिम चित्र स्पष्ट झाल्यावर येथील बंड काही प्रमाणावर थोपविण्यात नेत्यांना यश आलेले दिसत आहे. माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार अनिल बावनकर या प्रमुख नेत्यांनी माघार घेतली असली तरी ठाकचंद मुंगूसमारे यांची उमेदवारी कायम आहे. माजी आमदार सेवक वाघाये यांनीही प्रहार जनशक्ती पार्टीकडून निवडणुकीत दंड थोपटले आहे. शरद पवार गटाचे जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर, काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य खेमराज पंचबुद्धे, माजी नगरसेवक लक्ष्मीकांत सलामे यांनीही नामांकन परत घेतले आहे. (Bhandara District Assembly)

(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहली ऑस्ट्रेलियाला रवाना, चाहत्यांबरोबर काढले फोटो)

तुमसर मोहाडी मतदारसंघात महायुतीचे विद्यमान आमदार राजू कारेमोरे यांना पुन्हा उमेदवारीची संधी मिळाली आहे. तर, महाविकास आघाडीकडून चरण वाघमारे यांना थेट मुंबईतून मैदानात उतरविण्यात आले आहे. त्यांना तिसऱ्या आघाडीतील नाराजांचा सामना करावा लागणार आहे. ठाकचंद मुंगुसमारे अपक्ष उतरले आहेत. तर, कारमोरे यांच्या विरोधात धनेंद्र तुरकर अपक्ष म्हणून मैदानात आहेत. माजी आमदार सेवक वाघाये यांनीही जातीय समिकरणाची आखणी करीत प्रहार जनशक्ती पार्टीकडून उमेदवारी मिळविली आहे. (Bhandara District Assembly)

साकोलीत त्रिकोणी लढतीची शक्यता

साकोली विधानसभा मतदारसंघात निवडणूक अधिकच रोचक होत चालली आहे. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी ४ उमेदवारांनी नामांकन मागे घेतले. त्यामुळे आता १३ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. येथे काँग्रेस, भाजपा, वंचित बहुजन आघाडी, बसपा या प्रमुख पक्षांचे उमेदवार, तसेच काही क्षेत्रीय पक्षांचे उमेदवार आणि अपक्ष अशा राजकीय प्रतिनिधींचा सहभाग भाजपाचे बंडखोर उमेदवार सोमदत्त अपक्ष रिंगणात उतरल्याने या निवडणुकीत आहे. त्रिकोणी लढत होण्याची शक्यता आहे. भाजपाचे माजी आमदार काशीवार यांच्यासह मनोज बागडे, अण्णाजी कावळे, आणि मधुकर राजेश पारधी यांनीही आपले नामांकन मागे घेतले आहे. या निर्णयामुळे निवडणुकीतील समीकरणे बदलली असून निवडणूक अधिक चुरशीची साकोली मतदारसंघात काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर पक्षाने दुसऱ्यांदा विश्वास टाकला आहे. भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर यांच्याशी त्यांचा सामना रंगणार आहे. या दोघांमध्ये अपक्ष म्हणून लढत देणारे डॉ. सोमदत्त करंजेकर यांची उमेदवारीही लक्षवेधी ठरणार आहे. भाजपमधील नाराजांना घराबाहेर काढून प्रचाराच्या मैदानात उतरविण्यात पक्षाला किती यश येणार, हे पहाणे येथे महत्त्वाचे ठरणार आहे. या मतदारसंघातील प्रचार हळूहळू वेग धरत आहे. मोठ्या नेत्यांच्या सभांची येथे शक्यता आहे. (Bhandara District Assembly)

(हेही वाचा – हेलिकॉप्टरमधून उतरताच बॅग तपासल्यावर Uddhav Thackeray संतापले )

‘हे’ मुद्दे ठरणार चर्चेचे
  • भंडारा हा जिल्हा धान उत्पादक जिल्हा असून अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत.
  • शेतकऱ्यांना अवकाळीची नुकसान भरपाई मिळाली नाही अवैध रेती बंद असली तर मोठ्या प्रमाणात रेती तस्कर फोफावले आहेत. महामार्गाचे बेहाल झाल्याने वाढलेले अपघात

अपक्ष उमेदवार अधिक असल्याने प्रमुख पक्षाना घटक पक्षातील नाराजांची समजूत घालण्याचे तिन्ही ठिकाणी आव्हान

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.