भंडारा सामुहिक बलात्कार प्रकरण: मोठी कारवाई! एका पोलीस अधिकाऱ्यासह दोन कर्मचारी निलंबित

105

भंडारा सामुहिक बलात्कार प्रकरणी भंडारा पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. आपल्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्यावर तर दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी बारा तासांच्या आत मुख्य आरोपीला अटक केले आहे. पीएसआय दिलीप खरडे आणि एपीआय लखन उईके असी निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

(हेही वाचा – TET Scam: टीईटी परीक्षा घोटाळ्यातही ED करणार मनी लॉंड्रिंगचा तपास)

पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी यासंदर्भात माहिती देताना असे म्हटले की, ही घटना घडल्यानंतर भंडारा पोलिसांनी मुख्य आरोपींवर १२ तासांच्या आत कारवाई केले आहे. यामध्ये असे समोर आले आहे की, रात्री पीडित महिला लाखणी पोलीस स्टेशनमध्ये आली होती. त्यावेळी नेमकं काय झालं, याची चौकशी भंडारा जिल्हा पोलीस प्रमुखांनी केली आहे. सोमवारी त्या चौकशी अहवालानुसार, एक पोलीस अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण

गोंदिया जिल्ह्यातील ३५ वर्षीय विवाहित महिलेवर तीन नराधमांनी गोंदिया भंडारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या तीन ठिकणी घेऊन नेत सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी कारधा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. मात्र या घटनेतील मुख्य आरोपी हा अजूनही फरार आहे. भंडाऱ्यातील कारधा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या कन्हाळमोह गावात २ ऑगस्ट रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे.

पोलिसांनी दाखवलेल्या असंवेदनशीलतेमुळे महिलेवर पुन्हा अत्याचार झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. तसेच पिडीता ३१ जुलै रोजी लाखनी पोलीस ठाण्यात आली असताना पोलिसांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले आहे. जर ती पोलीस ठाण्यात पोहोचली होती, तर तिच्यावर तिथून पळून जा्ण्याची वेळ का आली., असे कित्येक प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.