उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रचारात धर्म आणि देवाच्या नावाने मते मागितली जात असल्याचा आरोप केला आहे. मध्यप्रदेश निवडणुकीत अमित शहा यांनी अयोध्येची वारी मोफत मिळणार असल्याचे आश्वासन दिल्याच्या प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पत्रही लिहिले आहे. उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी X या माध्यमावर टीका केली आहे. (Bhandrashekhar Bawankule Uddhav Thackeray)
(हेही वाचा – India in Final : उपांत्य फेरीतील विजयानंतर भारतीय ड्रेसिंगरुममध्ये असा झाला जल्लोष)
ठाकरेंना रामनामाची अॅलर्जी
काँग्रेसप्रमाणे आता उद्धव ठाकरेंना देखील रामनामाची ॲलर्जी झाली आहे.
रामनामाचा आणि रामभक्तांचा भाजपला अभिमान आहे.तुम्हाला मात्र आता रामनामाचा गजर केला की त्रास होतोय.
काँग्रेसनं प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वाचे पुरावे मागितले होते आता तुम्ही रामनाम आणि रामभक्तांचा तिरस्कार करत…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) November 16, 2023
चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी एका ट्विटद्वारे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, काँग्रेसप्रमाणे आता उद्धव ठाकरेंना देखील रामनामाची अॅलर्जी झाली आहे. रामनामाचा आणि रामभक्तांचा भाजपला अभिमान आहे. तुम्हाला मात्र आता रामनामाचा गजर केला की त्रास होतो. काँग्रेसने प्रभु रामचंद्रांच्या अस्तित्वाचे पुरावे मागितले होते. आता तुम्ही रामनाम आणि रामभक्तांचा तिरस्कार करत आहात. तुम्ही कितीही विरोध केला, तरी करोडो रामभक्त आयोध्येत जाऊन रामलल्लांचे दर्शन घेतील. (Bhandrashekhar Bawankule Uddhav Thackeray)
(हेही वाचा – Bank Strike : बँक कर्मचारी डिसेंबरपासून १३ दिवस संपावर)
मध्यप्रदेशच्या राजकारणाविषयी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, एकीकडे भाजपला फ्री हीट द्यायची आणि आमची विकेट घ्यायची हे बरोबर नाही. निवडणूक आयोगाने आचारसंहिता बदलली का, असा प्रश्नही निवडणूक आयोगाला केला आहे. निवडणूक आयोगाला आम्ही एक पत्र लिहिले आहे. 1995 ला आमचे सरकार राज्यात असताना हिंदुत्वाचा प्रचार केल्यामुळे बाळासाहेब ठाकरे आणि आमच्या काही आमदारांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता.” (Bhandrashekhar Bawankule Uddhav Thackeray)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community