>> विशेष प्रतिनिधी, मुंबई
भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त (Bharat jodo Nyaya Yatra) मी ४ हजार किलोमीटर चाललो. या यात्रेतून मला खूप काही शिकायला मिळाले, खूप प्रेम मिळाले, प्रसंगी अडचणींचाही सामना करावा लागला आहे, मात्र जे काही प्रेम मिळाले मी शब्दात व्यक्त करू शकत नाही, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भावना व्यक्त केल्या.
मणिपूर ते कन्याकुमारीपासून ते महाराष्ट्र मुंबईतील दादरपर्यंत तब्बल ४ हजार किलोमीटरची भारत जोडो न्याय यात्रेचा समारोपाच्या जाहीर सभेत बोलतांना राहुल गांधी या भावना व्यक्त केल्या. छत्रपती शिवाजी महाराज मैदानात पार पडलेल्या या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शरद पवार, उबाठा शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह तेजस्वी यादव, प्रकाश आंबेडकर, एम. के. स्टॅलिन आदींसह देशभरातील इंडि आघाडीतील पक्षांचे नेते उपस्थित होते. याप्रसंगी बोलतांना राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेसंदर्भातील आठवणी तसेच संकल्पनेची माहिती दिली. राहुल गांधी यांनी यावेळी ही यात्रा राहुल गांधी यांची नसून ही सर्व पक्षाची होती. सर्व पक्षांचा यामध्ये सहभाग होता,असे त्यांनी सांगितले.
आमची लढाई ही पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपाविरोधात नसून एका शक्ती विरोधात आहे. यावेळी त्यांनी मोदी यांच्यावर टिका करत राजा की, आत्मा एव्हीएम मशिनमध्ये असल्याचा आरोप केला. यावेळी महाराष्ट्रातील नेते हे भाजपाला घाबरून पक्ष सोडून जात असल्याचेही जात असल्याचेही सांगितले. तसेच ५६ इंचाची छाती असलेली ही व्यक्ती केवळ पोकळ व्यक्ती असल्याचाही आरोप केला.
चायनाच्या वस्तूंना टक्कर देण्याची क्षमता धारावीतील उत्पादनांमध्ये (Bharat Jodo Nyaya Yatra)
देशाला घडवण्याची ताकद धारावीमध्ये आहे, असे सांगत धारावीकरांची क्षमता ही चायनातील शॉन्सन शहरासारखी आहे. ज्याप्रकारे मेड इन चायन आहे तसेच मेड इन धारावी अशा प्रकारची उत्पादने होऊ शकतात. चायनाच्या वस्तूंना टक्कर देण्याची क्षमता धारावीतील उत्पादनांमध्ये आहे, पण चायनाच्या वस्तूंसाठी धारावीला महत्त्व दिले जात नाही, धारावीकरांच्या पाठिशी सरकार उभे राहत नसल्याचाही आरोप त्यांनी केला. केवळ २२ लोकांसाठी धारावीतील छोट्या उद्योजकांना मोठे होऊ देणार नाही. २२ उद्योगपती, ९० अधिकारी हेच देश चालवत असून मला सिस्टीम आतून माहित असल्याने मोदीला मी घाबरत नाही आणि मोदी मला घाबरवू शकत नाही असेही त्यांनी सांगितले. ईव्हीएमशिवाय मोदी निवडणूक जिंकू शकत नाही, असे सांगत राहुल गांधी यांनी मोदी ही एक व्यक्ती असून यासर्व सिस्टीमच्या विरोधात लढण्यासाठी ही इंडि आघाडी तयार केली असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community