भरत गोगावले यांची अखेर MSRTC च्या अध्यक्षपदावर वर्णी; पदभार स्वीकारला

राज्यात महायुती सरकार अस्तित्वात आले तेव्हापासूनच भरत गोगावले यांना मंत्रीपद मिळणार अशी चर्चा होती.

50
शिवसेनेत बंड करून ज्या ४० आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात सरकार स्थापन केले. त्या ४० आमदारांमध्ये अग्रस्थानी राहिलेले आमदार भरत गोगावले मागील दीड वर्षे मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत होते. त्यावरून त्यांची अनेकदा विरोधी पक्षांनी खिल्ली उडवली, पण आता गोगावले यांची इच्छा अखेर पूर्ण झाली. त्यांची राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) अध्यक्षस्थानी निवड झाली. भरत गोगावले यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) अध्यक्षपदाचा पदभार सांभाळला.
राज्यात महायुती सरकार अस्तित्वात आले तेव्हापासूनच भरत गोगावले यांना मंत्रीपद मिळणार अशी चर्चा होती. पण काही कारणांमुळे ते त्यांना मिळाले नाही. त्यामुळे ते नाराज होते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची एसटी महामंडळाच्या (MSRTC)  अध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. या पदाला राज्यमंत्रीपदाचा दर्जाही देण्यात आला आहे. त्यामुळे गोगावलेंचे मंत्रीपदाचे स्वप्नही एका अर्थाने पूर्ण झाले आहे. दरम्यान गोगावले यांनी पदभार स्वीकारताच राज्यभरातील एसटी (MSRTC)  बसस्थानकामध्ये सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.