>> विशेष प्रतिनिधी, मुंबई
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या (Bharat Jodo Nyay Yatra) समारोपाच्या जाहीर सभेनिमित्त दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांकडून फलक आणि बॅनर लावण्यात आले आहेत. हे फलक आणि बॅनर स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग तसेच स्वातंत्र्यवीर राष्ट्रीय स्मारकाच्या समोरील दर्शनी भागात लावण्यात आले होते. या फलकांना हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर सावरकर स्मारकासमोरील बॅनर हटवण्याची कार्यवाही त्वरित करण्यात आली आणि स्मारक परिसर काँग्रेसच्या फलक व बॅनरपासून मुक्त झाला.
छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात काँग्रेस नेते राहुल गांधी (Bharat Jodo Nyay Yatra) यांच्या प्रचार सभेची जय्यत तयारी चालू असून काँग्रेसच्या प्रत्येक नेत्यांसह कार्यकर्त्यांनी चमकोगिरी करत आपापल्या वतीने बॅनर व फलक लावले आहेत. संपूर्ण परिसरात बॅनर व फलकांशिवाय काहीच दिसत नसून स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावर तसेच या रस्त्यांच्या दुभाजकांवर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या समोरच हे बॅनर व फलक लावले आहेत. याला वीर सावरकरप्रेमी तसेच हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. राहुल गांधी यांनी कायमच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात गरळ ओकण्याचा आणि त्यांच्या विरोधात वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे राहुल गांधी हे सावरकर द्वेष्टे असून त्यांची छायाचित्र असलेले फलक व बॅनर वीर सावरकर यांच्या नावाने असलेल्या मार्गावर तसेच स्मारकाच्या समोर नको, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ‘एक्स’वर दिल्या गेल्या असून याबाबत सोशल मिडियावरून महापालिकेकडे तक्रार करत हे फलक काढून टाकण्याची मागणी केली आहे.
(हेही वाचा – Rahul Gandhi : राहुल गांधी यांची विठ्ठलमूर्ती स्वीकारण्यास टाळाटाळ; व्हिडिओ व्हायरल)
अॅड. आशुतोष दुबे यांनी एक्सवर पोस्ट करत शिवाजी पार्क आणि तेथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) ही आमची पवित्र ठिकाणे असून त्या ठिकाणी आणि आसपास फलक लावून ती विद्रूप करू नका, असे त्या पोस्टमध्ये म्हटले होते. या पोस्टवरील तक्रारीनंतर राष्ट्रीय स्मारकाच्या समोरील दर्शनी भागातील बॅनर काढण्याची कार्यवाही शुक्रवारी रात्री ८ नंतर सुरू झाली आणि त्यांनी तेथील बॅनर हटवून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचा परिसर बॅनरमुक्त झाला. (Bharat Jodo Nyay Yatra)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community