भारत जोडो न्याय यात्रेची सभा (Bharat Jodo Nyaya Yatra) शिवाजी पार्क येथे होत आहे. या सभेत इंडि आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित आहेत. सभेदरम्यान बोलताना उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि भाजपा सरकारवर हल्लाबोल केला आहे.
या सभेत आता भाजपाच्या डोक्यात हवा गेली आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी टीका केली तसेच हुकूमशाहीला तडीपार करण्यासाठी शिवाजी पार्क निवडलं, त्यासाठी राहुल गांधींचे आभार मानून पुढे ते म्हणाले की, रशियात निवडणुका सुरू आहेत, पण तिथे पुतीनचे विरोधक कुणीच नाहीत. जे विरोधक होते, ते तुरुंगात होते. काहींना तडीपार केलं आहे. दखवतात असं की, मी लोकशाही मानतो, पण माझ्यासमोरच कुणी नाही. तशी परिस्थिती सध्या आपल्या देशात आहे.
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदार मार्गदर्शिका प्रकाशित)
लोकशाही रक्षणाची आजपासून लढाई
देश हाच धर्म आहे. देश वाचला, तर आपण वाचू. आपली ओळख, व्यक्तिची ओळख देश असली पाहिजे. कुणीही राज्यकर्ता अमरपट्टा घेऊन येत नाही. हुकूमशहा केवढाही मोठा असला, तरी त्याचा अंत होतोच. तोडा फोडा आणि राज्य करा, असा जर इतिहास असेल, तर तो आपल्यात फूट पाडतोय त्यालाच तोडा फोडा आणि त्याच्या छाताडावर पाय देऊन राज्य करा. शिवतीर्थावर जेव्हा रणशिंग फुंकलं जातं. हातामध्ये मशाल घेऊन रणशिंग फुंकायचं आहे. लोकशाही रक्षणाची आजपासून लढाई सुरू होत आहे. तुम्ही कितीही अत्याचार करा. तुम्हाला तोडून, मोडून राहिल्याशिवाय राहणार नाही. ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी या सभेत म्हटले आहे.
हेही पहा –