मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना राहुल गांधी यांनी जी भारत जोडो यात्रा काढली होती, त्याचे नक्षलवाद्यांशी कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे. या यात्रेत सहभागी काही गट माओवाद्यांशी संबंधित होते, महाराष्ट्र निवडणुकीत जर महायुतीचा विजय झाला तर राज्यात कसे अराजक मजावयाचे याचे नियोजन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) आणि अन्य गटाच्या नेत्यांनी माओवाद्यांशी काठमांडू येथे झालेल्या बैठकीत केल्याची धक्कादायक माहित समोर आली आहे, असे फडणवीस म्हणाले. काँग्रेस आणि समविचारी पक्षांनी यासाठी माओवाद्यांशी मिळून जो कट रचला आहे, तो त्यांच्या अंगलट येईल, असा इशारा राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित (Pravin Dixit) यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ सोबत बोलताना दिला.
सुरक्षेच्या दृष्टीने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्था आणि राज्यातील पोलीस यंत्रणा यांच्यामध्ये अत्यंत चांगल्याप्रकारे समन्वय आहे. त्यामुळे माओवादी यांनी भारतात आणि भारताच्या बाहेर जे प्रयत्न सुरु केले आहेत ते ठेचून काढले जातील, यात काही शंका नाही, असेही प्रवीण दीक्षित म्हणाले. ज्या सामाजिक विषयांमुळे असंतोष माजवता येईल, त्या विषयांना घेऊन जन आक्रोश निर्माण करायचा आणि त्यामाध्यमातून घटनात्मक ज्या संस्था असतात त्यांच्याविषयी लोकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण करायचे. त्याच बरोबर लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना कामे करून द्यायचे नाही, ही माओवाद्यांच्या कामाची पद्धत आहे. त्यामध्ये त्यांनी आता EVM ला विरोध करण्याचा उद्योग सुरु केला आहे, असेही प्रवीण दीक्षित (Pravin Dixit) म्हणाले.
मुळात त्यांनी हातात घेतलेला विषय हा पूर्णपणे चुकीचा आहे. कारण EVM सारख्या शास्त्रीय, तांत्रिक विषयामध्ये विरोध करणाऱ्यांपैकी कोणताही गट सर्वोच्च न्यायालयाला किंवा निवडणूक आयोगाला या पद्धतीत काय चूक आहे, हे दाखवू शकलेला नाही. ज्यावेळी विरोध करणारा गट EVM च्या माध्यमातून निवडणूक येतात, त्यावेळी ते विजय साजरा करताना दिसतात. जसे वायनाड येथून प्रियंका वडेरा निवडून आल्या आहेत. किंवा झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि सहकरी गट निवडणूक आले, त्यावेळी या गटाने जल्लोष केला, परंतु जेव्हा EVM च्या माध्यमातून हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला, तेव्हा त्या विरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न हा गट करू लागला आहे. त्यांना लोकांची साथ मिळणार नाही, त्यांची दांभिक भूमिका लोकांच्या समोर जास्तीत जास्त येणार आहे. त्यामुळे माओवाद्यांनी कितीही प्रयत्न केला तरीही येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या चुकीच्या धोरणांना भारताची जनता साथ देणार नाही. हे स्पष्ट झाले आहे, असे प्रवीण दीक्षित (Pravin Dixit) म्हणाले.
काही सामाजिक संस्था राजकीय विषयांवर काही तरी आंदोलन करतात, रस्ता बांधायला, धरण बांधायला विरोध करतात किंवा अमुक एक कायदा संमत होऊ नये, यासाठी या संस्था कार्यरत असतात त्यांची कामे देशविरोधी असतात, अशा प्रकारच्या लोकांना आणि संस्थाना कायद्याच्या माध्यमातून शिक्षा झालीच पाहिजे, असे निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन म्हणाले.
Join Our WhatsApp Community