भारत जोडो यात्रा ही बरीच वादात सापडली आहे. केरळमध्ये असताना राहुल गांधी यांच्या समोर खिस्ती पाद्री यांनी ‘येशू हा एकमेव परमेश्वर आहे’, असे म्हटले होते. त्यानंतर ही यात्रा वादात सापडली होती महाराष्ट्रात आल्यावर राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर टीका केली, त्यामुळे या यात्रेवर जोरदार टीका झाली, आता ही यात्रा मध्य प्रदेशात गेल्यावर या यात्रेत ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे ही यात्रा भारत जोडो आहे कि भारत तोडो, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भारत जोड़ो यात्रा में खुलेआम नारा लगा "पाकिस्तान जिंदाबाद"
इसे कांग्रेस के ऑफिशियल हैंडल से ट्वीट किया गया , बाद में हटाया गया, लेकिन सच्चाई तो सामने आ गई कि कांग्रेस के दिल में क्या है pic.twitter.com/c6gm1S7cUj— लोकेन्द्र पाराशर Lokendra parashar (@LokendraParasar) November 25, 2022
(हेही वाचा ऐकावं ते नवलंच! भारत फिरायला आलेल्या बेल्जियम मुलीचे कर्नाटकच्या मुलाशी जुळले प्रेम केले लग्न!)
पोलिसांकडून गुन्हा दाखल
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रे दरम्यान पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याप्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खरगोनचे एसपी धरमवीर सिंह यादव यांनी सांगितले की, शनिवारी सनावद पोलिस ठाण्यात अज्ञात लोकांविरुद्ध कलम 153(बी) आणि 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी 21 सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ चालत असताना दिसत आहेत. या व्हिडिओच्या शेवटी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणांचा आवाज ऐकू येत आहे. हा व्हिडिओ 25 नोव्हेंबरच्या सकाळचा आहे. यावेळी यात्रा खरगोन जिल्ह्यातील सनावद भागातील भानभरड गावातून जात होती. सध्या यात्रा मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात दाखल झाली आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकारण तापले आहे. काँग्रेसच्या मध्य प्रदेश युनिटचे मीडिया प्रभारी केके मिश्रा यांनी हा एक बनावट व्हिडिओ आहे, ज्याद्वारे भाजप राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील पदयात्रेला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे.
(हेही वाचा अनिल परबांच्या अडचणीत वाढ, निकटवर्तीयाला ईडीचे समन्स )
Join Our WhatsApp Community