Bharat : आता ‘इंडिया’ संविधानातून होणार हद्दपार? ‘भारत’चा सन्मान

182
Bharat : आता 'इंडिया' संविधानातून होणार हद्दपार? 'भारत'चा सन्मान

आता लवकरच आपल्या देशाचा उल्लेख इंडिया ऐवजी ‘भारत’ (Bharat) होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सप्टेंबर ९ आणि १० रोजी दिल्लीच्या प्रगती मैदानावर जी २० परिषद होणार आहे. या परिषदेसाठी जगातील २६ देशांचे राष्ट्राध्यक्ष हजर राहणार आहेत. अशातच या G20 परिषदेसाठी देशांना पाठवण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असे लिहिण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळातून चर्चेला उधाण आले आहे.

आगामी निवडणुकांमध्ये मोदी सरकारला हरवण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येऊन आपल्या युतीचे ‘इंडिया आघाडी’ असे नाव ठेवले. त्यामुळे आता राजकीय वर्तुळातून इंडिया या नावावरून अनेक वाद होतांना दिसत आहेत. अशातच आता जी २० परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेवर इंडिया ऐवजी भारत (Bharat) असा उल्लेख केल्याने काँग्रेस पक्षासह अनेक विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे आता इंडिया या शब्दाऐवजी भारत हा शब्द वापरला जाणार असल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचा – First Lady Jill Biden : बायडेन यांच्या भारत दौऱ्यावर प्रश्नचिन्ह; लेडी बायडेन कोरोना पॉझिटिव्ह)

या सर्व वृत्तावर केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर जी-20 डिनरसंदर्भात राष्ट्रपतींनी पाठवलेल्या निमंत्रण पत्रावर ‘President Of India’ ऐवजी ‘President Of Bharat’ लिहिल्याचा दावा काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरवरून “संविधानाच्या आर्टिकल एक नुसार, भारत (Bharat) जो इंडिया आहे, जो अनेक राज्यांचा समूह म्हणून ओळखला जातो. परंतु आता या राज्यांच्या समुहावर हल्ला होत आहे.”असं म्हणत टीका केली आहे. त्यांच्या या टीकेवर भाजप कडून देखील उत्तर देण्यात आले, भाजप खासदार हरनाथ सिंह म्हणाले, इंडियाचा उल्लेख भारत करावा अशी संपूर्ण देशाची मागणी आहे. इंग्रजांनी इंडिया हा शब्द अपमान करताना वापरला होता. याउलट भारत (Bharat) हा शब्द आपल्या संस्कृतीचे प्रतिक आहे. त्यामुळे संविधानात बदल होणे गरजेचे आहे.

विशेष अधिवेशनात निर्णय होण्याची शक्यता

केंद्र सरकारकडून येत्या १८ सप्टेंबरपासून संसदेचं विशेष अधिवेशन भरवण्यात येणार आहे. या पाच दिवसीय अधिवेशनात अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. अशातच आता इंडिया ऐवजी भारत (Bharat) असा उल्लेख व्हावा या विषयावर देखील या अधिवेशनात चर्चा होऊन विधेयक संमत करण्याची मागणी होत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.