शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना (उबाठा गट) खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बाळासाहेबांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. बाळासाहेबांनी देशातील हिंदू आणि मराठी माणसांच्या हृदयावर अधिराज्य केले असल्याचे सांगत, त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे, अशी मागणी राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत केली.
राऊत म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे लोकमान्य नेते होते. राम मंदिर (Ram Mandir) उभारण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. त्यांच्यामुळे राम मंदिराचे स्वप्न साकार झाले. तरीही, आजपर्यंत त्यांना भारतरत्न पुरस्कार (Bharat Ratna Award) दिला नाही, हे दुर्दैवी आहे.”
(हेही वाचा – सैफ अली खानवर झालेला हल्ला खरा की अभिनय ? मंत्री Nitesh Rane यांचा तिखट सवाल)
यावेळी राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत म्हटले की, “भाजपा सरकारने अनेकांना राजकीय गणितासाठी भारतरत्न दिले आहेत. पण देशातील जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंना (Balasaheb Thackeray) हा सन्मान का नाही? हे सरकारच्या दुटप्पी राजकारणाचे उदाहरण आहे.”
राऊत (Sanjay Raut) पुढे म्हणाले की, “बाळासाहेबांचे विचार आणि प्रेरणा आजही आमच्यासोबत आहेत. ते केवळ नेते नव्हते, तर एका चळवळीचे अध्वर्यू होते. त्यांच्या योगदानाला योग्य सन्मान मिळायलाच हवा.”
शिवसेनेच्या उबाठा गटाने यापूर्वीही बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या नावाने पुरस्कार, स्मारके उभारण्याची मागणी केली आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा राऊत यांच्या या मागणीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजपा कडून या मागणीवर कोणती प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community