उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीत आझम खान यांना मुसलमानांनी ‘नाकारले’

160

उत्तर प्रदेशात रामपूर या विधानसभा पोट निवडणुकीत समाजवादी पक्षाचे आझम खान यांना जोरदार फटका बसला. आझम खान यांचे सदस्यत्व रद्द केल्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली. त्याठिकाणी आझम खान यांचा विश्वासू असीम रझा यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र भाजपच्या आकाश सक्सेना यांनी त्यांचा ३३ हजार मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे आझम खान यांनी या मतदारसंघातून १० वेळा निवडणूक जिंकली होती. कारण या मतदार संघात सर्वाधिक मुसलमान मतदार आहे, तरीही मुसलमान मतदारांनी भाजपच्या उमेदवाराला निवडून दिले.

उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाचे योगी सरकार आल्यापासून राज्यात प्रभाव असलेले आझम खान कुटुंब अडचणीत आले आहे. कायदेशीर खटल्यांमध्ये अडकलेल्या खान यांच्यापुढील मार्ग खडतर झाल्याचा दिसत आहे. रामपूर मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर त्यांची प्रतिष्ठा आणखी डागाळली आहे. मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर त्यांचा पक्षामधील प्रभाव कमी झाला आहे.

(हेही वाचा Gujarat Assembly Election result : गुजरातने ‘नरेंद्र’चा रेकॉर्ड मोडला – पंतप्रधान मोदी)

असीम रझा हे आझम खान यांचा उजवा हात 

पोटनिवडणुकीत नशीब आजमावणारे असीम रझा हे आझम खान यांचा उजवा हात समजला जातो. याआधी सपाने रामपूर लोकसभा मतदारसंघही गमावला आहे. या दोन्ही निवडणुकांमध्ये सपाच्या पराभवानंतर आता त्यांचे पूर्वीसारखे वर्चस्व राहिले नसल्याचे बोलले जात आहे. आझम खान यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्यांपैकी अनेक मुसलमान आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.