हिंदुद्वेष्ट्या शरजीलविरोधात आणखी एक गुन्हा दाखल! 

शरजील याने 'जे हिंदू 'जय श्रीराम' म्हणतात ते दहशतवादी असतात', असे वाक्य सोशल मीडियात टाकले आहे.

हिंदूंच्या श्रद्धास्थानाचा कायम अवमान करणारा शरजील उस्मानी याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या नेत्याने दिल्लीतील लक्ष्मी नगर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे. शरजील याच्याविरोधात याआधीही अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पुन्हा हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान!

शरजील उस्मानी याने पुन्हा एकदा हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान केला आहे. शरजील याने ‘जे हिंदू ‘जय श्रीराम’ म्हणतात ते दहशतवादी असतात’, असे वाक्य सोशल मीडियात टाकले आहे. त्या विरोधात भाजपचे नेते नवीन कुमार यांनी शरजील विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  त्यामुळे आता तरी पोलिस शरजील याच्यावर कडक कारवाई करतील, अशी अपेक्षा नवीन कुमार यांना आहे.

(हेही वाचा : सचिन अहिर शिवसेनेत लक्ष मात्र राष्ट्रवादीत!)

एल्गार परिषदेत गरळ ओकलेली!

अलिगड मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी शरजील उस्मानी हा कायम हिंदू, हिंदूंची संस्कृती आणि श्रद्धास्थान यांचा अवमान करतो. पुणे येथे ३० जानेवारी २०२१ रोजी पार पडलेल्या एल्गार परिषदेच्या सभेत त्याने हिंदूंच्या विरोधात वादग्रस्त विधान केले होते. या प्रकरणी त्याच्या विरोधात भारतीय दंड विधानमधील कलम १५३ (ए) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तरीही शरजील हा कायद्याला धड्कावून अजूनही हिंदूंच्या श्रद्धास्थानावर हल्ला करत आहे. सोशल मीडियातून तो हिंदूंच्या देवी-देवतांविरुद्ध अवमानकारक भाष्य करत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here