भास्कर जाधवांच्या गैरवर्तनाची सेनेने गंभीर दखल घ्यावी! देवेंद्र फडणवीसांची सूचना  

अपेक्षेपोटी जनता बोलत असते, अशा वेळी त्यांना अपमानित करणे, त्यांच्या अंगावर धावून जाणे चुकीचे आहे, असे फडणवीस म्हणाले.

सध्या राज्यात काही ठिकाणी पूरस्थिती आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी पूरग्रस्त भागातील जनतेचा आक्रोश लक्षात घेणे गरजेचे असते, त्यांच्या अंगावर धावून जाणे चुकीचे आहे, म्हणून शिवनेनेने भास्कर जाधवांच्या गैरवर्तनाची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व्यक्त केले.

जनता अपेक्षेपोटी बोलते! 

रविवार, २५ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चिपळूण येथे पूरग्रस्तांच्या व्यथा समजून घेण्यासाठी गेले होते, त्यावेळी पूरग्रस्त भागातील एक महिला अत्यंत आक्रोशीत होऊन व्यथा मांडत होती. तेव्हा शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी तिच्या दिशेने हातवारे करत तिला अपमानित होईल असा शब्दप्रयोग केला. याचे गंभीर पडसाद राजकीय पातळीवर उमटले. त्यावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे चिपळूण दौऱ्यावर असताना म्हणाले कि, जनता तुमच्या विरोधात नसते, पण त्यांना त्यांचा आक्रोश व्यक्त करायचा असतो. त्यांच्या काही अपेक्षा असतात. त्या अपेक्षेपोटी जनता बोलत असते, अशा वेळी त्यांना अपमानित करणे, त्यांच्या अंगावर धावून जाणे चुकीचे आहे, असेही फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा : पोलिसांसमोरच शिल्पा शेट्टी आणि राज कचाकचा भांडले!)

भास्कर जाधवांनी आत्मचिंतन करावे! 

जनतेचे म्हणणे ऐकून घेऊन त्यावर योग्य उपाययोजना काढण्याची गरज आहे. त्यासाठी प्रयत्न करायचा असतो, मात्र कालची घटना धक्कादायक होती. भास्कर जाधव हे ज्येष्ठ आमदार आहेत. मंत्रीही होते अशा परिस्थितीत त्यांच्याकडून असे वादग्रस्त वर्तन आयोग्य होते. त्यांनी यासंबंधी आत्मचिंतन करावे, तसेच शिवसेनेने याची गंभीर दाखल घेणे अपेक्षित आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here