शिंदे गटात जाण्यासाठी भास्कर जाधव यांनी 100 फोन केले; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

148

मागच्या काही दिवसांपासून शिवसेना आणि ठाकरे गट यांच्यामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशातच आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांच्या गटात सामील होण्यासाठी 100 वेळा फोन केल्याचा दावा मोहित कंबोज यांनी केला आहे.या ट्वीटनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक ट्वीट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी भास्कर जाधव यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. भास्कर जाधव यांनी मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या गटात सहभागी होण्यासाठी 100 वेळा फोन केल्याचा दावा या ट्वीटमध्ये केला आहे. मात्र, भास्कर जाधव यांच्यावर विश्वास नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भास्कर जाधव यांना गटात घेण्यास इच्छुक नसल्याचेही कंंबोज यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

काय म्हणाले कंबोज?

भास्कर जाधव यांनी गुवाहाटीचे तिकीट बुक केल्याचेही मोहित कंबोज यांनी सांगितले आहे. जाधव हे सत्य नाकारु शकतात का? असा सवालही मोहित कंबोज यांनी केला आहे. या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आता काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.