शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षाची स्थिती ही राख साचलेल्या निखाऱ्यासारखी झाली आहे. त्यावर फुंकर मारण्याची गरज निर्माण झाली आहे, असे मत ठाकरे गटाचे नेते तथा माजी मंत्री भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या विधानामुळे शिवसेना उबाठा पक्षात चर्चांना उधाण आले आहे.
( हेही वाचा : India-US Trade : भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार २०३० पर्यंत ५०० दशलक्ष अब्जांवर नेण्याचा संकल्प)
शिवसेना उबाठा पक्षाचे नेते राजन साळवी (Rajan Salvi) यांनी दि. १३ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे उबाठा शिवसेनेची (Shivsena UBT) कोकणातील (Konkan) ताकद कमी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी विधान केले आहे. भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) म्हणाले की, शिवसेनेची गत ही राख आलेल्या निखाऱ्यासारखी झाली आहे. त्यावर फुंकर मारण्याची गरज निर्माण झाली आहे. राजन साळवी गेल्यामुळे नव्हे तर ज्या पद्धतीने पक्षाचे चारही बाजूने लचके तोडले जात आहेत त्यावर चर्चा करण्याची गरज आहे, असेही जाधव (Bhaskar Jadhav) म्हणाले.
तसेच सद्यस्थितीत शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षाचा एकेक लचका तोडला जात आहे. पक्षाला चारही बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. या मुद्यावर आमच्या चर्चा सुरु असतात. या चर्चा कायम सुरु असतात. पण आमच्या चर्चेची पद्धती थोडी वेगळी आहे. आमचा पक्ष आदेशावर चालतो. पक्षप्रमुख हे आमच्याससारख्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत असतात, असे भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) पक्षाच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवताना म्हणाले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community