विरोधी पक्षनेतेपदासाठी उबाठा गटाकडून Bhaskar Jadhav यांच्या नावाचा प्रस्ताव

48

विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी उबाठा गटाने (Shivsena UBT) दावा केला असून भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीचा (MVA) सुपडा साफ झाला होता. तसेच एकाही पक्षाला विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असणाऱ्या २८ जागांचा टप्पा ओलांडता आला नव्हता. त्यामुळे गेल्या तीन-चार महिन्यांपासून विरोधी पक्षनेत्याची निवड होऊ शकली नव्हती.

(हेही वाचा – Champions Trophy 2025 : ऑस्ट्रेलिया ऑल आऊट; भारतासमोर २६५ धावांचे लक्ष्य)

सध्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session 2025) सुरु आहे. त्यामध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याची निवड निश्चित झाली असून उबाठा गटाकडून ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांच्या नावावर विरोधी पक्षनेतेपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदासाठी नेत्याची निवड करण्याचे अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. तसेच त्यांच्या नावाची विधिमंडळाकडे शिफारस करण्याची घोषणा केली.

अशी आहे भास्कर जाधव यांची राजकीय कारकीर्द

भास्कर जाधव हे उबाठा गटामधील ज्येष्ठ आमदार असून वर्ष १९९९ मध्ये ते शिवसेनेकडून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते २००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते गुहागर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदही सांभाळले. पुढे २०१९ मध्ये भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) पुन्हा शिवसेनेत परतले होते. तसेच २०१९ मध्ये शिवसेनेकडून आणि २०२४ मध्ये ठाकरे गटाकडून ते विधानसभेवर निवडून आले आहेत.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.