Bhaskar Jadhav उबाठा गटाला देणार दणका; शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता

82
Bhaskar Jadhav उबाठा गटाला देणार दणका; शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता
Bhaskar Jadhav उबाठा गटाला देणार दणका; शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता

शिवसेना उबाठाचे आक्रमक नेते आणि कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव शिवसेना उबाठाला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला आलेल्या अपयशानंतर भास्कर जाधव यांनी उबाठाच्या नेतृत्वावर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली होती. (Bhaskar Jadhav)

जाधव यांनी नुकतेच, “शिवसेना उबाठाची जवळजवळ काँग्रेसच झाली आहे,” असे विधान करत उद्धव ठाकरेंना घरचा आहेर दिला होता. त्यांच्या या विधानानंतर ठाकरे गटामधील अंतर्गत असंतोष उघड झाला आहे. ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा आहे. (Bhaskar Jadhav)

(हेही वाचा- शिवसेना उबाठाला कोकणात मोठा धक्का; Kankavli Assembly संपर्कप्रमुखांचा राजीनामा)

शिवसेनाचा दावा: मोठा पक्षप्रवेश लवकरच

शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी या पार्श्वभूमीवर सूचक विधान करत, “ठाकरे गटातून पुढील ८ दिवसांत मोठा पक्षप्रवेश होणार आहे,” असा दावा केला आहे. ते म्हणाले, “आपल्याला अपेक्षित असलेला असा मोठा प्रवेश २४ तारखेपर्यंत होईल. रत्नागिरीत शिवसेना उबाठाची संघटनात्मक स्थिती काँग्रेससारखी झाली आहे, आणि त्यामुळेच नेते आता आमच्याकडे येत आहेत.” (Bhaskar Jadhav)

भास्कर जाधव शिंदे गटात जाणार?

भास्कर जाधव यांच्याबाबत विचारले असता उदय सामंत म्हणाले, “जाधव यांनीच शिवसेना उबाठा काँग्रेससारखी झाली असल्याचे विधान केले होते. त्यांच्या विधानानंतर जर ते शिंदे गटात आले, तर हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या वारशासाठी महत्त्वाचे ठरेल. जाधव यांचे मार्गदर्शन आम्हाला फायद्याचे ठरेल.” (Bhaskar Jadhav)

(हेही वाचा- TikTok Ban: भारतानंतर अमेरिकेत ही टिकटॉकवर बंदी कायम; सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवण्यास दिला नकार )

जाधवांच्या हालचालींवर राजकीय वर्तुळात लक्ष

भास्कर जाधव यांची कुंचबणा वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना ठाकरे गटातील काही नेते पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत असल्याने, कोकणातील ठाकरे गटाचे संघटन कमकुवत होत असल्याचे दिसते. भास्कर जाधव शिवसेना मध्ये प्रवेश करणार का, याकडे सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्यांच्या निर्णयाचा कोकणातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होऊ शकतो. (Bhaskar Jadhav)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.