सध्या उद्धव ठाकरे गटाला एका मागून एक धक्के बसत आहेत. आता आणखी मोठा धक्का बसणार आहे. कारण नागपुरात ठाकरे गटातील महत्वाचा पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये संजय राऊत यांचे निकटवर्ती भाऊ चौधरी यांचे नाव चर्चेत आले आहे. कारण संजय राऊत यांनी ट्विट करून नाशिकचे जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांनी शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे म्हटले आहे.
शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेना तसेच संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे.शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात येत आहे@OfficeofUT
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 21, 2022
नाशिकचा कारभार सांभाळायचे
संजय राऊत यांच्या कायम सावली सारखे बरोबर राहणारे म्हणून भाऊ चौधरी यांना ओळखले जाते. भाऊ चौधरी हे नाशिकचा कारभार सांभाळत होते. संजय राऊत तुरुंगात जाताना आणि तुरुंगातून बाहेर येताना देखील भाऊ चौधरी त्यांच्या बरोबर होते. परंतु, आता ते शिंदे गटाचा प्रवेश करणार आहेत. दरम्यान, भाऊ चौधरी हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या माहितीनंतर त्यांची शिवसेनेतून हाकालपट्टी करण्यात आल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेना तसेच संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात येत आहे’, अशी माहिती संजय राऊत यांनी ट्विट करून दिली आहे.
Join Our WhatsApp Community