शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. सईद खान यांचे मरीन ड्राइव्ह येथील वैयक्तिक ऑफीस ईडीने जप्त केले होते. ते खाली करण्यात मुदतवाढ देण्यात आली आहे. 180 दिवसांत जप्त केलेली मालमत्ता खाली करावी लागते, मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने अजून 180 दिवसांची मुदत वाढवून दिली आहे. सईद खान यांच्यावर ईडीने अटकेची कारवाई केली होती, मात्र नुकताच त्यांना जामीन मिळाला आहे. भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष समितीत झालेल्या फेरफारानंतर ईडीने ही कारवाई केली होती.
सईद खान यांना 180 दिवसांची अजून मुदत मिळाली असून, ते संबंधित विभागाकडे दाद मागू शकतात. मागील एक वर्षापासून ईडीची खासदार भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान यांच्याविरोधात कारवाई सुरु आहे.
( हेही वाचा: ‘वर्षा’चे कधी होणार ‘एकनाथ’? )
Join Our WhatsApp Community