Uddhav Thackeray : ‘राज आणि उद्धव एकत्र न येण्यामागे उद्धव ठाकरेच’; खासदार भावना गवळींची जहरी टीका

157
Uddhav Thackeray : 'राज आणि उद्धव एकत्र न येण्यामागे उद्धव ठाकरेच'; खासदार भावना गवळींची जहरी टीका

ठाकरे गटातून शिवसेनेत गेलेले खासदार, आमदार सध्या ठाकरे गटावर (Uddhav Thackeray) टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशातच सेनेच्या खासदार भावना गवळी यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्या राजकीय नात्यावर भाष्य करतांना उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. राज आणि उद्धव एकत्र न येण्यामागे उद्धव ठाकरेच जबाबदार अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाल्या भावना गवळी?

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना कधी नातं टिकवताच आलं नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद कधीच मिटले असते मात्र उद्धव ठाकरेंनी कधीच पुढाकार घेतला नाही. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाच राज ठाकरे यांच्याशी जुळवून घ्यायचे नव्हते. तसेच पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की; साहेब तुम्ही कधीच कुणाला चांगली वागणूक दिली नाही. आम्ही १३ खासदार का गेलो? याचे चिंतनही तुम्ही केले नाही. तुमच्या पक्षाचे ४० ते ५० आमदार शिंदे यांच्यासोबत का जातात? याचंही चिंतन तुम्हाला करावंसं वाटलं नाही.

(हेही वाचा – Talathi Exam : तलाठी भरती परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वीच प्रवेशद्वार बंद; विद्यार्थ्यांनी घातला गोंधळ)

तुम्ही कधी बंधन पाळले नसल्यानेच आजची परिस्थिती निर्माण झाली

भावना गवळी पुढे म्हणाल्या की, माझ्यासारखी कर्तृत्वान महिला शिवसेनेत पाचवेळा निवडून आली. माझ्या मतदारसंघात मी गेल्या २४ वर्षापासून रक्षा बंधनाचा कार्यक्रम राबवते. मी वाजपेयींना राखी बांधली तसेच मोदींना देखील मी राखी बांधली आहे. त्यामुळे नातेसंबंधांवर तुम्ही बोलू नये. तुम्ही (Uddhav Thackeray) कधी बंधन पाळले नसल्यानेच आजची परिस्थिती निर्माण झाली असाल्याचा गंभीर आरोप भावना गवळी यांनी केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.