भिवंडी महापालिकेतील काॅंग्रेसच्या 20 माजी नगरसेवकांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर ही सदिच्छा भेट असल्याचा खुलासा माजी महापौर जावेद दळवी यांनी केला आहे. पक्षातील 20 नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. आम्ही शिंदे गटात प्रवेश केला नसून, आमच्या जिल्ह्याचे नेते म्हणून आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी शहरातील प्रलंबित विकास कामांसाठी निधी व काॅंग्रेसच्या बंडखोर 18 नगरसेवकांवर कारवाईबाबत चर्चा झाल्याची माहिती माजी महापौर जावेद दळवी यांनी दिली आहे.
( हेही वाचा: आता संपूर्ण आरक्षण सोडत की फक्त ओबीसीच? )
मुख्यमंत्र्यांचे ट्वीट
दुसरीकडे शिंदे गटात नगरसेवक येणे सुरुच आहे. गुरुवारी सकाळी आदित्य ठाकरे यांचा भिवडींत मेळावा पार पडला. त्यानंतर रात्री भिवंडीच्या शिवसेना नगरसेवकरांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला. याबाबत एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केले आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी महानगरपालिका तसेच ठाणे ग्रामीण विभागातील शिवसेना नगरसेवक तसेच पदाधिका-यांनी नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन युती सरकारला जाहीर पाठिंबा दर्शवला, असे ट्वीट शिंदे यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Communityठाणे जिल्ह्यातील भिवंडी महानगरपालिका तसेच ठाणे ग्रामीण विभागातील शिवसेना नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन युती सरकारला जाहीर पाठींबा दर्शविला.#realshivsena pic.twitter.com/kIjMETN4yO
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 21, 2022