मशिदींवरील भोंग्यांविरूद्ध सिनेमागृहात घुमणार ‘आवाज ‘! 

या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून महाराष्ट्र राज्याचा 'बेस्ट फिल्म', 'बेस्ट ग्रामीण फिल्म' आणि 'बेस्ट डायरेक्टर' हे पुरस्कार मिळाले आहेत.

133

मशिदींवरील भोंग्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण, या सामाजिक प्रश्नावर एक गठ्ठा मतांच्या राजकारणामुळे राजकीय पातळीवर गांभीर्याने निर्णय घेतला जात नाही, हे दुर्दैव आहे. विशेष म्हणजे या भोंग्यांविरोधात सर्वोच्च न्यायालय, लखनऊ, मुंबई उच्च न्यायालय यांनी निर्णय देऊनदेखील कुणाची त्यावर अंमलबजावणी करण्याची हिंमत होत नाही, हे मत दुसऱ्या-तिसऱ्या कुणाचे नसून ही समस्या चित्रपटाच्या माध्यमातून अचूकपणे मांडणारे आणि त्या चित्रपटामुळे ‘बेस्ट डायरेक्टर’ पुरस्कार मिळवणारे ‘भोंगा-अजान’ चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांचे आहे.

मालेगाव येथील माझा मुस्लिम मित्र आहे, त्याच्या घराच्या आजूबाजूला ८-१० मशिदी आहेत. त्याला नुकतेच बाळ झाले होते, त्या बाळाला भोंग्याचा आवाज सहन होत नव्हता, त्यामुळे त्यानेच मला हा विषय निवडायला सांगितले. त्यामुळे हा विषय निवडला. भोंग्याच्या प्रदूषणाविरुद्ध सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे, तरीही त्यावर राजकीय पातळीवर कार्यवाही होत नाही, हे दुर्दैव आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याने अधिक बळ मिळाले आहे. हा विषय घेऊन आपण स्वतः १७-१८ निर्मात्यांकडे गेलो. पण कथा पाहून कुणी पुढे येत नव्हते, शेवटी असे सामाजिक विषय मांडणे गरजेचे आहे.
– शिवाजी लोटन पाटील, दिग्दर्शक.

चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त! 

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत सामाजिक विषयांवर आधारित नवनवीन उत्तम चित्रपट येत आहेत, असाच एक विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला ‘भोंगा – अजान’ नावाचा चित्रपट भेटीला येत आहे. ध्वनी प्रदूषण आणि धर्म याविषयावर गल्लत करणाऱ्या मुस्लिम धर्मातील कट्टरपंथीयांवर नेमकेपणाने आसूड उगारण्यात आलेल्या या सिनेमाच्या टीझरला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. एका कुटुंबातील ९ महिन्यांच्या बाळाला दुर्धर आजार झालेला असतो. मशिदीत भोंग्याच्या आवाजामुळे या बाळाच्या तब्येतीवर सतत परिणाम होत असतो. परिणामी बाळाचा त्रास वाढत जातो. त्यामुळे मशिदीवरील भोंगा बंद करण्याचा गावकऱ्यांचा प्रयत्न आणि त्याला होणार विरोध याची गोष्ट दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी मांडली आहे. या सिनेमाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे, या सिनेमाची निर्मिती अमोल कांगणे यांनी केली आहे. २४ सप्टेंबर रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून महाराष्ट्र राज्याचा ‘बेस्ट फिल्म’, ‘बेस्ट ग्रामीण फिल्म’ आणि ‘बेस्ट डायरेक्टर’ हे पुरस्कार मिळाले आहेत.

(हेही वाचा : कर्नाटकात पहाटेची अजान ऐकूच येणार नाही!)

या ठिकाणी मशिदींवरील भोंग्यावर झाली कारवाई!

गोव्यात न्यायालयाने भोंग्यावर लावला चाप!

नुकतेच गोवा, फोंडा येथे राहणारे सॉफ्टवेअर इंजिनिअर वरूण प्रिलोकर यांनी ते वर्क फ्रॉम होम करताना दिवसातून ५ वेळा मशिदीतील भोंग्यांमधून अजान ऐकू येत असल्याने ध्वनी प्रदूषण होते, एकाग्रता भंग होते, म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाच्या आदेशावरून अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने गोव्यातील फोंडा भागातील ४ मशिदींच्या विश्वस्तांना ध्वनी प्रदूषण नियम पाळा अन्यथा भोंगे बंद करा, असा आदेश दिला.

प्रयागराजमध्ये भोंग्याचा आवाज झाला कमी! 

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील सिव्हिल लाईन येथे राहणाऱ्या अलाहाबाद विद्यापीठाच्या कुलगुरू प्रो. संगीता श्रीवास्तव यांनी त्यांच्या घराच्या बाजूला असलेल्या मशिदीतून पहाटे ५.३० वाजता मोठ्या आवाजात अजान ऐकू येत असल्याने आपली झोप मोड होत आहे, यातून ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन होत आहे, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे १५ मे २०२० रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने मशिदींवरील भोंग्यांविरोधात दिलेल्या आदेशाची प्रत जोडत यासंबंधी प्रयागराज जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तेथील भोंग्यांचा आवाज मशिदीपुरता मर्यादित ठेवण्याचा आदेश दिला.

मानखुर्दमध्ये भोंग्यावर महापालिकेची कारवाई! 

मानखुर्द येथे राहणारी करिष्मा भोसले या तरुणीने तिच्या घराच्या बाजूला एक खांबावर मशिदीचा भोंगा लावण्यात आला होता, म्हणून त्याला तिने पोलिस ठाण्यात जाऊन विरोध केला. तेव्हा तिला स्थानिक मुसलमानांनी ‘भोंग्याचा त्रास होत असेल तर घर बदला’, अशी धमकी दिली. पोलिसही तक्रार लिहून घेत नव्हते. त्यानंतर यावर सोशल मीडियातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आणि करिश्माला मोठा पाठिंबा मिळाल्यावर अखेर महापालिकाने हा भोंगा तेथून हटवला.

(हेही वाचा : अजानच्या आवाजाने एकाग्रता जाते, गोव्यात मशिदीच्या भोंग्याचा आवाज न्यायालयाने दाबला!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.