मनोरा आमदार निवासाचे ३ ऑगस्टला भूमिपूजन; चार वर्षांनी मिळाला मुहूर्त

'मनोरा'च्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

188
मनोरा आमदार निवासाचे ३ ऑगस्टला भूमिपूजन; चार वर्षांनी मिळाला मुहूर्त
मनोरा आमदार निवासाचे ३ ऑगस्टला भूमिपूजन; चार वर्षांनी मिळाला मुहूर्त

बहुचर्चित मनोरा आमदार निवासाच्या भूमिपूजनाला तब्बल चार वर्षांनी मुहूर्त मिळाला आहे. गुरुवारी, ३ ऑगस्टला सकाळी १० वाजता ‘मनोरा’चे भूमिपूजन केले जाणार आहे.

बहुचर्चित मनोरा आमदार निवास पाडून तब्बल चार वर्षे उलटली, तरी पुनर्बांधणी होत असल्याने राजकीय कार्यकर्ते आणि मंत्रालयात कामानिमित्त येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती. मात्र, आता ‘मनोरा’च्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असून, एल अँड टी कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. वास्तुविशारद व सल्लागार म्हणून सुप्रसिद्ध वास्तू रचनाकार शशी प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २०१८ च्या आराखड्यानुसार, मनोरा आमदार निवासाच्या पुनर्विकासासाठी सुमारे ८५० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र गेल्या चार वर्षांत त्यात बरीच वाढ झाली असून, नव्या अंदाजपत्रकानुसार हा खर्च १ हजार २६९ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.

(हेही वाचा – सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाईंची गळफास घेत आत्महत्या, आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट)

१९९४ मध्ये मनोरा आमदार निवास उभारण्यात आले. मात्र, अवघ्या २५ वर्षांत ही इमारत जीर्ण झाली. पावसाचे पाणी पाझरणे, प्लॅस्टर पडणे, यासह अनेक अडचणी येऊ लागल्या आणि इमारत धोकादायक ठरविली गेली. त्यामुळे ती पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. २०१९ मध्ये ती जमीनदोस्त करण्यात आली. राज्य सरकारने या ठिकाणी नवीन अत्याधुनिक इमारत बांधण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर सोपवली. मात्र, चार वर्षे उलटली, तरी त्यांना एकही वीट रचता आलेली नाही.

असे असेल नवे आमदार निवास

नवीन मनोरा आमदार निवासाचे बांधकाम आधुनिक स्थापत्यशैलीनुसार केले जाणार आहे. त्यात ४० आणि २८ मजली दोन इमारतींचा समावेश असेल. आमदारांना देण्यात येणाऱ्या प्रत्येक कक्षाचे क्षेत्रफळ १ हजार चौरस फूट असेल. ८०९ वाहने एकावेळी पार्क करता येतील, इतक्या क्षमतेचे पोडियम पार्किंग उभारले जाणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.