PFI सदस्यांचे पाकिस्तानी कनेक्शन उघड, सापडले 50 पेक्षा जास्त पाकिस्तानी नंबर

119

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेशी संबंधित विविध ठिकाणांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून छापेमारी सुरू आहे. पीएफआय सदस्यांचे दहशतवादी संघटनांशी संपर्क असल्याचे पुरावे या छापेमारीदरम्यान समोर येत आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या पीएफआय सदस्यांचे पाकिस्तानी कनेक्शन देखील उघड होत असून त्यांच्या मोबाईलमध्ये 50 पेक्षा जास्त पाकिस्तानी नंबर सापडल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात येत आहे. भोपाळ एटीएसने केलेल्या कारवाईत ही माहिती समोर आली आहे.

भोपाळ एटीएसने पीएफआयचे प्रदेशाध्यक्ष अब्दुल करीम,प्रदेश कोषाध्यक्ष मोहम्मद जावेद,प्रदेश सचिव जमील शेख आणि सचिव अब्दुल खालिद यांना अटक करण्यात आली आहे. तसेच पीएफआयच्या अन्य काही सदस्यांना देखील अटक करण्यात आली असून हे आरोपी अनेक वेळा पाकिस्तानात गेले असल्याचे समजत आहे.

(हेही वाचाः पीएफआयशी संबंधित इसमाच्या एसटीएफने आवळल्या मुसक्या)

50 पेक्षा जास्त पाकिस्तानी नंबर

त्यामुळे आता यंत्रणांकडून टेरर फंडिंगच्या बाबतचे पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल खालिदच्या मोबाईल फोनमध्ये 50 पेक्षा जास्त पाकिस्तानी नंबर सापडले आहेत. तसेच त्याचा भाऊ मोहम्मद महमूद हा 6 वेळा पाकिस्तानात गेला होता. त्याचाही पोलिस शोध घेत आहेत.

आरोपींचे मोबाईल फोन,लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्ऱॉनिक वस्तूंची तपासणी पोलिसांकडून करण्यात येत आहे. देशभरातील 15 राज्यांत असलेल्या पीएफआय कार्यकर्त्यांची धरपकड एनआयए आणि राज्य एटीएसच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.