-
सुजित महामुलकर
भाजपाचे बहुमत
तत्कालीन सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची मुदत ऑगस्ट २०२२ मध्ये संपुष्टात आल्यापासून विधान परिषदेचे सभापती पद रिक्त असून परिषदेचे कामकाज उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या सांभाळत होत्या. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात संख्याबळाअभावी निंबाळकर यांनी निवडणूक टाळली होती. आता महायुतीकडे पुरेसे संख्याबळ असल्यामुळे भाजपाचा सभापती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विधान परिषदेत सध्या भाजपकडे सर्वाधिक ३० आमदार असल्यामुळे या पक्षाचाच सभापती होणार हे निश्चित झाले आहे. बुधवारी सकाळी १० वाजता शिंदे उमेदवारी अर्ज भरणार आहेत, अशी माहिती राम शिंदे यांनी दिली. (Legislative Council Election)
विधान परिषदेचे ज्येष्ठांचे सभागृह
महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या ६ घटकराज्यांत द्विगृही कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात आहे. बाकी सर्व घटक राज्यांत एकगृह विधानसभा हे कायदेमंडळ पद्धती आहे. तेथे विधान परिषद अस्तित्वात नाही. (Legislative Council Election)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community