ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी, शिवसेनेत प्रवेश केला. भूषण देसाई शिवसेनेत गेल्यामुळे ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान सुभाष देसाईंना या आधीच प्रवेशाबाबत सांगितलं होत. शिंदेंची काम करण्याची पद्धत आवडल्यानं शिवसेनेत प्रवेश केला, असं भूषण देसाईंनी स्पष्ट केलं.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रसार माध्यमांसोबत संवाद साधताना भूषण देसाई म्हणाले की, ‘बाळासाहेब हेच माझं दैवत आणि शिवसेना. या दोन शब्दांना सोडून माझ्यासमोर तिसरं काहीही आलं नाही. हिंदुत्वाचा विचार आणि या राज्यासाठी बघितलेलं साहेबांचं जे स्वप्न होतं, स्वरुप होतं. ते जर आज कोणी पुढे घेऊन जात तर ते शिवसेना आणि भाजप महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हेच पुढे घेऊन जातायत आणि वाढवतायत. आणि त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आम्ही आधीपासून एकत्र काम केलं आहे. मी त्यांना जवळून बघितलं आहे. त्यांच्या कामाचा वेग, त्यांचा निर्णय, त्यांची क्षमता, आणि इथे सर्वसामान्य जनतेला जो त्यांच्या इथे कारभार बघायला मिळतो, तो मी जवळून अनुभवल्यामुळे त्यांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय मी घेतलेला आहे.’
‘माझं स्वतःचं प्रत्यक्षात आणि अप्रत्यक्षात सामाजिक कार्य होत. एक छोटा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. पण शिंदेसाहेंबाना जवळून बघतं बघतं, आणि नवीन सरकार यांचं काम बघून यामुळे प्रेरित होऊन मी त्यांच्या जवळ येऊन त्यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. याबाबत माझं खूप आधी सुभाष देसाईंसोबत बोलणं झालं होत. आणि हा निर्णय मी फार आधी घेतला होता. जेव्हा हे नवीन सरकार स्थापन झालं होत तेव्हाच मी निर्णय घेतला होता,’ असं भूषण देसाई म्हणाले.
(हेही वाचा – सुभाष देसाईंचा मुलगा भूषण देसाईंचा ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश)
Join Our WhatsApp Community