सरकारकडे अभियंत्याने मागितली रिव्हाॅल्व्हर अन् पंकजा मुंडे संतापल्या…

बीड जिल्ह्यातील एक कार्यकारी अभियंत्याने स्वसंरक्षणासाठी रिव्हाॅल्व्हरची मागणी केली हे किती दुर्दैवी आहे, असं भाजपाच्या नेत्या गोपिनाथ मुंडे यांनी ट्विट करत म्हटलं आहे. बीड जिल्ह्यात माफिया राज बोकाळल्याचा अजून कोणता पुरावा हवा आहे ? असा संतप्त सवालही त्यांनी सरकारला केला आहे. अंबाजोगाईच्या बांधकाम विभागात अनागोंदी कारभार आहे. ‘कंत्राटदार धमक्या देऊन कट्यार दाखवून बिलांवर सह्या घेतात” असे पत्र अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे, तर आपल्याला कामकाज करता यावे यासाठी चक्क रिव्हाल्व्हर देण्याची मागणी केली आहे.

पंकजा मुंडेचं टीकास्त्र

याप्रकरणावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ट्विट करत त्यांनी हा प्रकार दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्याचे नियंत्रण राहिलेले नाही, त्यामुळेच गेल्या कांही महिन्यांपासून जिल्हयात वाळू माफिया, गुटखा माफिया, चोरांना- गुंडांना अभय, खोटया केसेस दाखल करणे, गुन्हयात अडकवणे, व्यापाऱ्यांच्या एजन्स्या हडपणे, चांगल्या संस्थेवर दबाव टाकून प्रशासक आणणे असे प्रकार सत्तेचा गैरवापर करून सर्रास चालू आहेत’ असं म्हणत पंकजा मुंडे यांनी सरकारवर तोफ डागली आहे.

(हेही वाचा :कोरोना बाधिताच्या संपर्कात आलाय? काय कराल, वाचा ‘ICMR’ची नवी नियमावली )

अभियंत्याने काय लिहिलयं पत्रात

सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाईचे कार्यकारी अभियंता म्हणून काही दिवसांपूर्वीच संजयकुमार कोकणे यांची नियुक्ती झाली आहे. कोकणे हे मूळ नाशिकचे रहिवासी आहेत. मात्र त्यांनी अंबाजोगाईत येताच येथील कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. येथे देयके अदा करण्याच्या बाबतीत पूर्णतः अनागोंदी असून, धमक्या देऊन किंवा कट्यार दाखवून बिले तयार करून आणि मंजूर करून घेतली जातात, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित काम करता यावे, यासाठी रिव्हॉल्व्हर द्यावी, अशी मागणी कार्यकारी अभियंता कोकणे यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या मागणी नंतर प्रशासनात खळबळ माजली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here