स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज्यांचा ३५०वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला करण्यात आला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यापैकी एक म्हणजे मुंबईतील कोस्टल रोडला आता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
(हेही वाचा – शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी उदयनराजे भोसलेंना दिली महत्त्वाची जबाबदारी)
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘आज लंडनच्या संग्रहालयातील भवानी तलवार आणि वाघनख महाराष्ट्रात परत आणण्याचाही आपल्या सरकारचा प्रयत्न आहे. सुधीर मुनगंटीवार त्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी पंतप्रधान मोदी मदत करतील आणि त्यामुळे आपलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या आग्र्यामध्ये आणि दीवान-ए-आम मध्ये शिवरायांचा अपमान झाला होता, जिथून स्वराज्याची ठिणगी पडली, तिथे आपण शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली. अंगावर रोमांच निर्माण करणारा, दृष्ट लागण्यासारखा तो सोहळा होता. शिव प्रतापाच्या आणि संभाजी राजांच्या कर्तृत्वालाही आम्ही वंदन करतो आणि त्यांचं स्मरण करतो. म्हणून औरंगाबादचं “छत्रपती संभाजीनगर”, उस्मानाबादचं “धाराशिव” आणि आता यापुढे अहमदनगर “पुण्यश्लोक अहिल्यादेवी” नावानं ओळखलं जाईल. मुंबईची लाईफ लाईन असलेल्या कोस्टल रोडला, जो सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प आहे त्यालाही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिलं. दरम्यान दिल्लीमध्ये फक्त आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करून थांबलो नाही तर उत्तर प्रदेश सरकारला देखील शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा सप्रेम भेट दिला.’
हेही पहा –
Join Our WhatsApp Community