Sunil Raut : राऊत बंधूंना मोठा झटका; सुनील राऊत यांच्या विश्वासू सहकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश

विक्रोळी विधानसभा क्षेत्रात राऊत यांच्यासाठी धोक्याची घंटा वाजायला सुरुवात

306
Sunil Raut : राऊत बंधूंना मोठा झटका; सुनील राऊत यांच्या विश्वासू सहकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
Sunil Raut : राऊत बंधूंना मोठा झटका; सुनील राऊत यांच्या विश्वासू सहकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई महापालिकेचे प्रभाग क्रमांक ११८ चे माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत वर्षा निवासस्थानी जाहीर प्रवेश केला. उपेंद्र सावंत हे विक्रोळीतील नगरसेवक असून शिवसेना उबाठा गटाचे आमदार सुनील राऊत यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. त्यामुळे सावंत यांच्या या शिवसेना प्रवेशामुळे शिवसेना उबाठा गटाचे खासदार, नेते संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांच्यासाठी हा मोठा झटका मानला जात आहे.

विक्रोळी विधानसभेतील माजी नगरसेविका सुवर्णा करंजे यांच्यानंतर आता प्रभाग क्रमांक ११८ चे नगरसेवक उपेंद्र सावंत यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे आमदार राऊत यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. उपेंद्र सावंत अत्यंत तळागाळात काम करणारे कार्यकर्ते असून त्यांचा विभागांत दांडगा जनसंपर्क आहे. ते स्वतः विभागांत फिरून प्रत्येक समस्या जाणून घेत महापालिका आणि संबंधित विभागाशी पाठपुरावा करत त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे सुनील राऊत यांची विभागातील मोठी मदार सावंत यांच्यावरच असते. त्यामुळेच ते सुनील राऊत यांचे अत्यंत विश्वासू म्हणून विभागांत ओळखले जातात.

मात्र सुनील राऊत यांचा विभागातील सर्व नगरसेवकांच्या प्रभागातील वाढता हस्तक्षेप आणि नगरसेवकांच्या कामांवर आयते श्रेय लाटण्याचा त्यांचा प्रयत्न यामुळे कंटाळून सावंत यांनी शिवसेनेची वाट धरली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता उपेंद्र सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्या मुळे विक्रोळी विधानसभा क्षेत्रात राऊत यांच्यासाठी धोक्याची घंटा वाजायला सुरुवात झाली असल्याचे दिसून येत आहे.

(हेही वाचा – Eye Care Tips : डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी करा ‘ही’ ३ योगासने

शिवसेनेत मागील चार दिवसांपू्र्वीच काँग्रेसचे माजी नगरसेवक बब्बु खान, गंगा माने, पुष्पा कोळी, जोत्सना परमार,पदाधिकारी कुणाल नरेश माने, भास्कर शेट्टी आदींनी प्रवेश केला होता. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या आणि २०१७ च्या निवडणुकीत निवडून आलेल्या २५ माजी नगरसेवकानी प्रवेश केला असून सावंत यांच्या प्रवेशाने ही संख्या आता २६ झाली आहे.

सन २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुका प्रभाग क्रमांक ११८ मधून उपेंद्र सावंत यांनी विजय मिळवताना ९,९९० मध्ये मिळवली होती.या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर मनसेचे जयंत दांडेकर यांना ८८५२ मते मिळाली होती. तर भाजपचे मंगेश सांगळे यांना ४३७९ मते मिळाली होती. त्यामुळे शिवसेना आणि भाजपला या मतदारसंघात मनसेचे प्रमुख आव्हान आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेना -भाजप एकत्र आल्यास मनसेला टक्कर देणे सोपे जाईल याच विचाराने सावंत यांनी प्रवेश केला असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केल्यानंतर उपेंद्र सावंत यांनी आपण कन्नमवार नगर टागोर नगर या भागात शिवसेनेचे काम अधिक जोरात करू आणि पक्ष संघटना वाढवू असा निर्धार केला. मागील दीड वर्षात आपल्या प्रभागात विकास कामे करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता आपण या शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे सावंत यांनी सांगितले.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.