… आणि संतापलेले CM Eknath Shinde थेट गेले काँग्रेसच्या कार्यालयात

250
... आणि संतापलेले CM Eknath Shinde थेट काँग्रेसच्या कार्यालयात शिरले
... आणि संतापलेले CM Eknath Shinde थेट काँग्रेसच्या कार्यालयात गेले

मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचाराची सभा संपवून परत निघालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पाहून एका व्यक्तीने अपशब्द वापरल्यामुळे मोठा राडा झाला.

नक्की घडले काय ?

साकीनाका येथील सभा संपवून ९० फूट रस्त्यावर जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा ताफा अडवण्यात आला. संतोष कटके (Santosh Katke) नावाच्या व्यक्तीने काळा झेंडा घेऊन मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करीत मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरला. त्याचवेळी त्यांच्या गाडीची काच खाली असल्यामुळे तो शब्द मुख्यमंत्र्यांनी ऐकला आणि त्यांचा राग अनावर झाला आणि ते थेट विरोधी पक्षाच्या म्हणजेच महाविकास आघाडीच्या उमेदवार नसीम खान यांच्या कार्यालयात शिरले. संबंधित कार्यकर्त्याला जाब देखील विचारला. त्यानंतर मुख्यमंत्री ताफ्यात असलेल्या पोलिसांनी संतोष कटकेला (Santosh Katke) ताब्यात घेतले.

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : धडक कारवाईत आत्तापर्यंत १० कोटी ७१ लाखांचा अवैध मुद्देमाल जप्त)

कोण आहे संतोष कटके ?

संतोष कटके (Santosh Katke) हा शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जाते. शाखा क्रमांक १६४ चे शाखाप्रमुख साईनाथ कटके यांचा तो भाऊ आहे. ९० फूट रोड येथे काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर तो बसलेला असतानाच हा प्रकार घडला. दस्तूर खुद्द मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात शिरल्यामुळे काही मिनिटांतच वातावरण तापले होते. मुख्यमंत्री गेल्यानंतर संतोष कटके (Santosh Katke) यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात घेऊन आले.

मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली. महाविकास आघाडीचे उमेदवार नसिम खान हे देखील पोलीस स्थानकात पोहोचले.

दरम्यान, संतोष कटकेला (Santosh Katke) ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशनसमोर ठिय्या मारला होता. यानंतर पोलिसांनी समज देऊन संतोष कटके यांची सुटका केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.