शिंदे सरकारचा मोठा निर्णय; DCP पराग मणेरे यांची पुन्हा नियुक्ती, उद्धव ठाकरे सरकारने केले होते निलंबित

102

महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या कथित खंडणी प्रकरणी उद्धव ठाकरे सरकारने निलंबित केलेले डीसीपी पराग मणेरे यांना एकनाथ शिंदे सरकारने पुन्हा सेवेत घेतले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये उद्धव सरकारने परमबीर सिंह यांना कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल सेवेतून निलंबित केले होते. यासोबतच खंडणी व भ्रष्टाचाराचे आरोप असलेले डीसीपी पराग मणेरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली होती. मुख्य गृह सचिवाच्या अध्यक्षतेखाली आढावा समितीने हा निर्णय घेतला आहे.

( हेही वाचा :आता एकाच कार्डवर मध्य आणि पश्चिम रेल्वेतून करु शकता प्रवास; रेल्वेने आणली ‘ही’ योजना )

पराग मणेरेंवर भ्रष्टाचाराचा आरोप 

परमबीर सिंग यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात महाविकास आघाडी सरकारने सेवेतून निलंबित केले होते. याच प्रकरणात डीसीपी पराग मणेरे यांच्यावरदेखील भ्रष्टाचाराचे आणि खंडणीचे आरोप झाले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारने मणेरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना सेवेतून निलंबित केले होते. मात्र आता नवीन सरकार सत्तेत येताच पराग मणेरे यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. आता यावर विरोधकांच्या काय प्रतिक्रिया असतील ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.