मोठी बातमी! कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या तारखेत बदल

Assembly Elections 2023 tripura votes on Feb 16, Meghalaya, Nagaland on Feb 27; counting on March 2

पुण्यातील कसबा , चिंचवड पोटनिवडणूक तारखेत बदल करण्यात आला आहे. 27 फेब्रुवारी ऐवजी 26 फेब्रुवारीला पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. बारावीच्या परीक्षांमुळे मतदानाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. या पोटनिवडणुकीच्या निकालाच्या तारखेत बदल करण्यात आलेला आहे. निकाल 2 मार्चलाच लागणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने पत्रक प्रसिद्ध करत दिली आहे.

पुण्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या. कसबाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर येत्या 27 फेब्रुवारीला मतदान होणार होते. मात्र, या तारखेत आता बदल करण्यात आला आहे. आता 26 तारखेला मतदान होणार आहे. बारावीची परीक्षा आणि मतदार एकाच दिवशी आल्याने या तारखेत बदल करण्यात आल्याचे पत्राद्वारे सांगण्यात आले आहे.

( हेही वाचा: लखीमपुरी खेरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्राला सशर्त जामीन मंजूर )

2 मार्चला निकाल होणार जाहीर

या निवडणुकीची अधिसूचना 31 जानेवारी रोजी जारी करण्यात येणार असून, 7 फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. 8 फेब्रुवारीला अर्जांची छाननी तर 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत. या दोन्ही पोटनिवडणुकांसाठी मतदान 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 2 मार्च रोजी जाहीर होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here