वाल्मिक कराडविरोधात सीआयडीच्या हाती खंडणीसंदर्भातील मोठा पुरावा लागला आहे. आवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांच्या फोनमध्ये रेकॉर्ड झालेल्या कॉलमध्ये कराडने दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे आणि ती न दिल्यास गंभीर धमकी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. कराडने, “पैसे दिले नाही तर कायमची वाट लावून टाकेन आणि हातपाय तोडून टाकेन,” असे धमकावल्याचे रेकॉर्डिंगमध्ये ऐकायला मिळाले आहे. (Walmik Karad)
(हेही वाचा- Republic Day Parade पाहण्यासाठी 10,000 विशेष पाहुण्यांना निमंत्रण)
कॉल रेकॉर्डिंगमुळे उडाली खळबळ
२९ नोव्हेंबर रोजी कराडने विष्णू चाटेच्या फोनवरून सुनील शिंदेंना हा धमकीवजा फोन केला होता. विशेष म्हणजे, त्याच दिवशी सुदर्शन घुले आवादा कंपनीच्या साईटवर पोहोचल्याची नोंद आहे. यामुळे हा प्रकार अधिक गंभीर ठरला आहे. या रेकॉर्डिंगच्या आधारावर कराडच्या आवाजाचा नमुना घेऊन तपासणी करण्यात येणार आहे. (Walmik Karad)
सुरेश धस आक्रमक
या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी कराडच्या कृत्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. नव्याने समोर आलेल्या कॉल रेकॉर्डिंगने कराडच्या विरोधातील पुरावे मजबूत झाले आहेत, असे सुरेश धस यांनी सांगितले. (Walmik Karad)
(हेही वाचा- National Human Trafficking Awareness Day : राष्ट्रीय मानवी तस्करी जागरूकता दिनाचे महत्त्व काय आहे?)
तपासाला वेग
सीआयडीने मिळवलेल्या या पुराव्यामुळे तपासाला गती मिळाली असून कराडच्या इतर कृत्यांचीही चौकशी केली जात आहे. नव्या रेकॉर्डिंगने राजकीय आणि औद्योगिक वर्तुळात खळबळ उडवली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कसा होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Walmik Karad)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community