मोठे पक्ष छोट्या पक्षांना संपवून टाकत आहेत; Kapil Patil यांनी व्यक्त केली नाराजी

259

विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी उमेदवारी देऊन देखील शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना निवडून आणता आले नाही. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतल्या छोट्या पक्षांच्या नेत्यांचे कान उभे राहिले आहेत. महाविकास आघाडीतल्या मोठ्या पक्षांच्या नेत्यांची राजकीय वर्तणूक अशीच राहिली तर आपण करायचे काय ?, याचा विचार करण्याची वेळ शेकाप, शिक्षक भारती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष यांच्या नेत्यांवर आली आहे. (Kapil Patil)

कपिल पाटलांनी व्यक्त केली नाराजी

शिक्षक भारती संघटनेचे नेते कपिल पाटील म्हणाले की, इंडी आघाडीत आम्ही होतो. महाविकास आघाडीत निमंत्रण दिल्यामुळे आमची समाजवादी गणराज्य पार्टी हा घटक पक्ष आहे. आम्ही जोरदार काम केले. हुकुमशाहीविरोधात आम्ही लोकशाहीच्या बाजूने होतो. कुठलीही अट शर्थ न ठेवता आम्ही साथ दिली. आघाडीचा धर्म होता, ज्याची विद्यमान जागा असते त्याला ती मिळते. मागील ३ टर्म आम्ही ही जागा लढतोय, जिंकत आलोय. भाजपा-शिवसेना आणि इतर पक्षांच्या उमेदवारांचे तिन्ही वेळा डिपॉझिटही वाचलं नाही. (Kapil Patil)

(हेही वाचा – Borivali : बाभई स्मशानभूमी येत्या १५ जुलैच्या आत सुरु न झाल्यास…)

शरद पवारांनी आपल्या राजकीय कौशल्याने छोट्या पक्षांना महाविकास आघाडीशी बांधून ठेवल्याचे मराठी माध्यमांनी भरपूर कौतुक केले. पण प्रत्यक्षात राजकीय लाभ द्यायची वेळ आली, तेव्हा पवार या छोट्या पक्षांना तो लाभ देऊ शकले नाहीत. राजू शेट्टींना राज्यपाल नियुक्त आमदार करू शकले नाहीत. कपिल पाटील, जयंत पाटील यांना निवडून आणता आले नाही. त्यामुळेच आता विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी छोट्या पक्षांच्या नेत्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. (Kapil Patil)

शरद पवारांवर भरवसा ठेवून महाविकास आघाडीशी जोडून राहण्यात मतलब नाही, असा विचार छोट्या पक्षांमध्ये बळावत चालला आहे. मुंबई शिक्षक मतदार संघात महाआघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिक्षक भारतीचे नेते कपिल पाटील यांच्या उमेदवाराचा उबाठाने पराभव केला. (गंमत म्हणजे कपिल पाटीलांच्या समाजवादी गणराज्य पक्षाची स्थापनाच उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली होती.) (Kapil Patil)

छोटे पक्ष अजगराच्या विळख्यात – आशिष शेलार

तर आता विधान परिषद निवडणुकीत ही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेकापचे उमेदवार शेतकरी नेते जयंत पाटील यांचा उबाठाने ठरवून पराभव केला. सोबत असलेल्या छोट्या पक्षांना संपवण्याचे काम कोण करतोय…? महाराष्ट्र पाहतोय!! छोट्या पक्षांनो तुम्ही अजगराच्या विळख्यात सापडला आहात, असा टोला शेलार यांनी ठाकरेंना लगावला आहे. (Kapil Patil)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.