परवानगी नाही तरी हजारो मुसलमान एमआयएमच्या मोर्चासाठी मुंबईच्या दिशेने

137

राज्याला सध्या निवडणुकांचे वेध लागले आहेत, त्यातच मुंबई महापालिका निवडणुकीकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष केंद्रित झाले असून एमआयएमनेही याकरता मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्त्वाखाली एमआयएम आझाद मैदानातयेेेेेेेेेे शनिवार, ११ डिसेंबर रोजी मुसलमानांचा मोर्चा काढणार आहे. मात्र नुकतेच रझा अकादमीच्या आंदोलनामुळे ठिकठिकाणी दंगली झाल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली नाही. तरीही राज्यभरातून हजारो मुसलमान मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.

मुस्लिम आरक्षणाच्या मुद्यावर मोर्चा

एमआयएमच्या या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी मुंबईत शुक्रवारी, ११ डिसेंबरच्या रात्रीपासून ते सोमवारी, 12 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत मोर्चा, रॅली किंवा कोणत्याही आंदोलनाला परवानगी दिलेली नाही. तरीही आम्ही मोर्चा काढणारच, असे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी जाहीर केले आहे. यावेळी असदुद्दीन ओवैसी मुसलमानांना संबोधित करणार आहे. मुस्लिम आरक्षणाच्या मुद्यावर मोर्चा काढणार असल्याचे ओवैसी यांनी आधीच घोषित केले होते. दरम्यान नुकतेच रझा अकादमीने राज्यभर मोर्चे, निदर्शने केली, तेव्हा मुसलमानांनी दंगली, जाळपोळ केल्या होत्या.

(हेही वाचा न्यायालयाने खडसावल्यावर मलिकांना उपरती, वानखेडेंची मागितली माफी)

मुंबई पोलिसांनी जारी केले नवे आदेश

याची पोलिसांनी  गंभीर दखल घेत मुंबईत मोर्चे, निदर्शने यांना प्रतिबंध करणारा आदेश जारी केला. त्या आदेशात अमरावती, नांदेडमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचाराचाही संदर्भ देण्यात आला आहे. तसेच राज्यात सध्या कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन पसरत असल्याने काळजी म्हणून रॅली, आंदोलन आणि सभांना परवानगी नसल्याचे आदेशात म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.