राज्याचे आरोग्य मंत्री डाॅक्टर तानाजी सावंत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यांतील ढोकी येथील तोरणा साखर कारखाना मंत्री सावंत यांच्या भैरवनाथ साखर उद्योग समूहाला भाडेतत्वावर देण्याचे आदेश कर्ज वसुली न्यायालयाने दिले आहेत. सावंत यांच्याविरोधात माजी मंत्री अमित देशमुख यांनी याचिका दाखल केली होती. आता याच याचिकेवर न्यायालयाने सावंत यांना दिलासा दिला आहे.
उस्मानाबादचा तेरणा कारखाना माजी मंत्री अमित देशमुख यांना चालवण्यासाठी हवा होता. मंत्री तानाजी सावंत आणि अमित देशमुख यांच्यात त्यासाठी तीव्र स्पर्धा झाली. हा कारखाना ज्याच्या ताब्यात, राजकीय सत्ता त्याच्या खिशात असे उस्मानाबादमधले समीकरणच आहे. पण जिल्हा बॅंकेंने केलेली प्रक्रिया योग्य ठरवत ढोकीचा तेरणा साखर कारखाना सावंत यांच्या भैरवनाथ साखर समुहाला भाडेतत्वावर देण्याचे कर्ज वसुली न्यायाधिकरण न्यायालयाने आदेश दिले आहेत. हा कारखाना पुढची 25 वर्षे सावंत यांच्या समुहाकडे राहणार आहे.
( हेही वाचा: सत्तेचा दुरुपयोग करून मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात काय पुरुषार्थ? नारायण राणेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल )
उस्मानाबाद जिल्हा बॅंकेने राबवलेली टेंडर प्रक्रिया योग्य
उस्मानाबाद जिल्हा बॅंकेने राबवलेली टेंडर प्रक्रिया योग्य असल्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. काॅंग्रेस नेते आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्या 21 शुगर उद्योग समूहाची याचिका फेटाळली आहे. भैरवनाथ समुहाला आगामी 25 वर्षांसाठी तेरणा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा मार्ग या आदेशामुळे मोकळा झाला आहे.
Join Our WhatsApp Community