Bihar : नितीश कुमार, तेजस्वी यादव भेटीमुळे भाजपा अस्वस्थ

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती

113
Bihar : नितीश कुमार, तेजस्वी यादव भेटीमुळे भाजपा अस्वस्थ
  • प्रतिनिधी

बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांची भेट झाल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाने गुरुवारी (५ सप्टेंबर) एका बैठकीचे आयोजन केले होते. मात्र या भेटीमुळे भाजपा अस्वस्थ झाली असल्याचे बोललं जातंय. या बैठकीत राजदचे सर्वोच्च नेते लालू यादव यांनी पक्षाचे आमदार, खासदार आणि अन्य प्रमुख नेत्यांशी चर्चा केली.

(हेही वाचा – T20 World Record : ऑस्ट्रेलियाने ६ षटकांत चोपल्या ११३ धावा, टी-२० तील अनेक विक्रम धारातीर्थी)

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेश नाकारण्यात आलेल्या या बैठकीबाबत बोलताना राजदचे प्रवक्ते शक्ती यादव म्हणाले, १० सप्टेंबरपासून तेजस्वी यादव यांची यात्रा सुरू होणार आहे. ते संपूर्ण बिहारचा दौरा करणार आहेत. बूथ, पंचायत स्तरावरील कार्यकर्त्यांशी त्यांच्याकडून संवाद साधला जाणार आहे. या यात्रेच्या संदर्भात तसेच पक्ष संघटना बळकट करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. पक्षाच्या या विस्ताराची प्रक्रियाही आता हाती घेण्यात आली आहे. ते पुढे म्हणाले की, मंगळवारी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांची जी भेट झाली होती, त्यामुळे भारतीय जनता पार्टी घाबरली आहे. (Bihar)

(हेही वाचा – Telangana मध्ये मुसलमान रिक्षाचालकाने आदिवासी महिलेवर केले लैंगिक अत्याचार)

माहिती आयुक्त निवड संदर्भात बैठक

वास्तविक बिहारच्या माहिती आयुक्तांच्या निवडीसंदर्भात या दोन नेत्यांची भेट होती. मात्र तरीही भाजपाच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. बिहारमध्ये (Bihar) कोणता मोठा बदल आता होणार नाही. राज्यात जेव्हा महाआघाडीचे सरकार होते तेव्हा जातनिहाय जनगणना झाली होती. आरक्षणाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. ते ५० टक्क्यांवरून ६५ टक्क्यांपर्यंत नेण्यात आले होते. तथापि, पाटणा उच्च न्यायालयाने ते रद्द केले. त्याचा घटनेच्या नवव्या सूचित समावेश करण्याच्या संदर्भात चर्चा सुरू आहे. राष्ट्रीय स्तरावर जातनिहाय जनगणना केली जाण्याची मागणीही आमच्याकडून केली जाणार आहे. तसेच बिहार विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती तयार करण्याचे कामही आम्ही सुरू केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.