Bihar : आमदार ‘नॉट रिचेबल’; काँग्रेसचे टेन्शन वाढणार

बिहारमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय गोंधळादरम्यान काँग्रेसचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. राजकीय उलथापालथ होण्याच्या पार्श्वभूमीवर आता बिहारमधील काँग्रेसच्या काही आमदार 'नॉट रिचेबल' झाले आहेत. काही आमदारांचे फोन सतत बंद येत आहेत.

246
Bihar : आमदार 'नॉट रिचेबल'; काँग्रेसचे टेन्शन वाढणार
Bihar : आमदार 'नॉट रिचेबल'; काँग्रेसचे टेन्शन वाढणार

सध्या राजकीय वर्तुळात सर्वात जास्त चर्चा बिहारची (Bihar) सुरु आहे. सुशासन बाबु नितिश कुमार (Nitish Kumar) कोणत्याही क्षणी भूमिका बदलू शकतात. यामुळे इंडी आघाडीला (I.N.D.I. Alliance) तर मोठा फटका बसणार आहेच पण काँग्रेसचे (Congress) टेन्शन वाढणार असल्याचे कळतंय. कारण शनिवार (२७ जानेवारी) सकाळपासून काँग्रेसचे (Congress) काही आमदार ‘नॉट रिचेबल असल्याचे समजतंय. (Bihar)

बिहारमध्ये (Bihar) सध्या सुरू असलेल्या राजकीय गोंधळादरम्यान काँग्रेसचे (Congress) टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. राजकीय उलथापालथ होण्याच्या पार्श्वभूमीवर आता बिहारमधील काँग्रेसच्या (Congress) काही आमदार ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. काही आमदारांचे फोन सतत बंद येत आहेत. अशी शक्यता वर्तवली जात आहे की, काँग्रेसचे हे आमदार मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या जेडीयूमध्ये प्रवेश करण्याची शक्यता बोलवून दाखवली जात आहे. (Bihar)

(हेही वाचा – Pune Crime : पुणे विमानतळावर २ सोने तस्करांना अटक)

नितीश कुमारांचा कोणत्याही क्षणी राजीनामा

बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका बदलल्याची चर्चा आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएसोबत जाण्याचे त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. नितीश कुमार (Nitish Kumar) कोणत्याही क्षणी राजीनामा देऊ शकतात आणि भाजपसोबत नव्याने सरकार स्थापन करु शकतात. बिहारमध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या बैठकांचा धडाका सुरु आहे. (Bihar)

प्रजासत्ताक दिनानिमित्त राजभवनात आयोजित चहापानाच्या कार्यक्रमात नितीश कुमार (Nitish Kumar) सहभागी झाले होते. त्यामुळे बिहारमधील राजकीय भूकंपाबाबत सुरू शक्यतांना जोर आले आहे. राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते विजय कुमार सिन्हा यांच्यासह इतर पाहुण्यांना शुभेच्छा देताना दिसले. (Bihar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.