पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार (Bihar Political Crisis) रविवारी सकाळी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. मात्र जोपर्यंत मुख्यमंत्री नितीश कुमार आपला राजीनामा देत नाहीत तोपर्यंत भाजप ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहे अशी माहिती प्रदेश अध्यक्ष सम्राट चौधरी यांनी दिली आहे. आधी नितीश कुमार (Chief Minister Nitish Kumar) यांनी राजीनामा द्यावा, त्यानंतर भाजप आपली भूमिका जाहीर करेल, असे चौधरी म्हणाले.
मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला –
तसेच एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट केले आहे की, बिहारचे (Bihar Political Crisis) मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज सकाळी राज्यपालांशी भेटण्याची वेळ मागितली आहे.
जे. पी. नड्डा शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता
तर दुसरीकडे, मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar Political Crisis) रविवारी, २८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता जेडीयूच्या आमदारांसोबत बैठक घेण्याची शक्यता आहे. यानंतर ते राजभवनात जाऊन राज्यपालांकडे आपला राजीनामा सादर करू शकतात आणि संध्याकाळपर्यंत बिहारमध्ये भाजपच्या पाठिंब्याने नवीन सरकार स्थापन होऊ शकते. नितीश कुमार यांच्यासोबतच भाजपशासित दोन उपमुख्यमंत्रीही शपथ घेतली. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा हे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. (Bihar Political Crisis)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community