Bihar : प्रशांत किशोर बिहारच्या २४३ जागांवर निवडणूक लढणार; ‘या’ तारखेला होणार जन सुराज पार्टीची स्थापना

301
Bihar : प्रशांत किशोर बिहारच्या २४३ जागांवर निवडणूक लढणार; 'या' तारखेला होणार जन सुराज पार्टीची स्थापना
  • वंदना बर्वे

बिहारच्या राजकारणात नवा ट्विस्ट येणार आहे. या ट्विस्टमुळे केवळ लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलालाच नव्हे; तर सुशासनबाबू मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाही मोठा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. (Bihar)

पुढच्या वर्षी अर्थात २०२५ च्या सुरुवातीला बिहार विधानसभेची निवडणूक होणे आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयू आणि भारतीय जनता पक्षाची युती आहे. सद्या या युतीची बिहारमध्ये सरकार आहे. बिहार विधानसभेची निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वात लढविली जाणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे. दुसरीकडे, लालू प्रसाद यादव आणि काँग्रेसची आघाडी झाली आहे. ही आघाडी मिळून निवडणूक लढणार आहे. महायुती आणि इंडी आघाडी निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. (Bihar)

अशातच, बिहारच्या राजकारणात एका नवीन पक्षाची एंट्री होण्याच्या मार्गावर आहे. गांधी जयंती दिनी या पक्षाची औपचारिक घोषणा होणार आहे. हा पक्ष नवीन असला तरी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून ते आतापर्यंत झालेल्या कितीतरी विधानसभेच्या निवडणुकीचे व्यवस्थापन या नवीन पक्षाच्या प्रमुखांने केले आहे. (Bihar)

(हेही वाचा – Ratangiri Mansoon Update: रत्नागिरीत तुफान पाऊस; ‘जगबुडी’मुळे संपर्क तुटला!)

नवीन पक्षाच्या प्रमुखांचे म्हणजे प्रशांत किशोर आहे. किशोर यांनी राज्यात जन सुराज या नावाने एक मोहीम छेडली असून याच नावाने हा पक्ष अस्तित्वात येणार आहे. प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी जाहीर केले आहे की, त्यांच्या जन सुराज मोहिमेचे आता राजकीय पक्षात रूपांतर होणार आहे. २ ऑक्टोबर २०२२ रोजी सुरू झालेली जन सुराज पदयात्रा २ ऑक्टोबर २०२४ रोजी राजकीय पक्षाचे रूप घेईल. (Bihar)

पाटणा येथील ज्ञान भवन येथील बापू सभागृहात रविवारी (९ जून) हा निर्णय घेण्यात आला. जन सुराज संघटनेशी संबंधित हजारो लोकांनी एकदिवसीय संवाद कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमात एकूण तीन प्रस्ताव आणण्यात आले होते. जन सुराज अभियानाच्या सर्व सदस्यांनी सर्व ठराव एकमताने मंजूर केले. (Bihar)

(हेही वाचा – एक्झिट पोलच्या दिवशी Share Market मध्ये हेराफेरी झाल्याचा राहुल गांधींचा आरोप SEBI ने धुडकावला)

जन सुराज हा राजकीय पक्ष केव्हा घोषित करायचा याचा पहिला प्रस्ताव आणला गेला. यावर सर्वांनी एकमताने २ ऑक्टोबर २०२४ ही तारीख निश्चित केली. बिहारमधील सर्व २४३ जागांवर होणाऱ्या निवडणुकीत जन सुराजने सहभागी व्हावे, असा दुसरा प्रस्ताव आणला होता. या प्रस्तावालाही सर्वांनी एकमताने संमती दिली. तिसरा ठराव संमत करण्यात आला की जन सुराज संघटनेत समाजातील सर्व घटकांचा सहभाग सुनिश्चित करेल आणि संख्येनुसार तिकिटे दिली जातील. हा प्रस्तावही सर्वांनी एकमताने मंजूर केला गेला. (Bihar)

जन सुराजचे संस्थापक किशोर म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीतही महिलांचा सहभाग निश्चित होईल. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील एका विधानसभेच्या जागेवरून किमान एका महिलेला उमेदवारी दिली जाईल. जन सुराजच्या निर्मितीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीला संविधान तयार करण्यास परवानगी देण्यात आली. किशोर यांनी जन सुराज संघटनेच्या सदस्यांना बूथ, पंचायत, ब्लॉक आणि जिल्हा स्तरावर संघटना मजबूत करून जन सुराज अभियान यशस्वी करण्यासाठी घरोघरी जाण्याचे आवाहन केले. (Bihar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.