बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला अजून थोडा वेळ असला तरी राज्यात सत्ता प्रस्थापित करण्यासाठी भाजपाचे राजकीय डावपेच खेळणे सुरु झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी विनोद तावडे यांनी बिहारमध्ये पहिला मोठी खेळी खेळली आहे. लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने भाजपाने बिहार प्रदेशाध्यक्षांना घरी बसविले आहे. तसेच सम्राट चौधरी यांच्याजागी राज्यातील मंत्री डॉ. दिलीप जयस्वाल यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद सोपवले आहे. (Bihar)
सम्राट चौधरी हे नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिही आहेत. बिहारमध्ये भाजपाने लोकसभा निवडणुकीत १७ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी १२ जागांवर विजय मिळाला आहे. त्यांच्या तुलनेत नितीश कुमार यांच्या पक्षाचा स्ट्राईक रेट चांगला राहिला आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे बिहारचे प्रभारीही आहेत. त्यामुळे त्यांचा हा निर्णय बिहारमधील पक्षाची रणनीती ठरवणारा मानला जात आहे. (Bihar)
(हेही वाचा – Nashik-Mumbai Highway च्या दुरुस्तीसाठी नाशिककर उतरणार रस्त्यावर)
बिहारमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने त्याचा ठपका सम्राट चौधरी यांच्यावर ठेवला जात होता. तसेच ते उपमुख्यमंत्री असल्याने त्यांच्याकडील प्रदेशाध्यक्ष पद काढून घेतले जाणार, अशी चर्चा होती. लोकसभेत त्यांच्या कुशवाह समाजातील मतेही भाजपला मिळाली नाहीत. त्यामुळे चौधरी यांच्याविषयीची नाराजी वाढत चालली होती. चौधरी यांना हटवताना भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी जातीचे कार्ड खेळल्याची चर्चा आहे. जयस्वाल यांना राज्याचे प्रमुखपद देऊन भाजपाने वैश्य व्होट बँक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. कुशवाहा व्होट बँक राष्ट्रीय जनता दलाकडे गेल्याचा दावा भाजपा नेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे वैश्य समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. (Bihar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community