बंगाल विधानसभेत भाजप-टीएमसी आमदारांत तुंबळ हाणामारी!

बीरभूम हिंसाचाराच्या मुद्यावरून झाले रणकंदन

90

पश्चिम बंगालच्या बीरभूममधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून सोमवारी विधानसभेत जोरदार रणकंदन झाले. यावेळी भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या आमदार सदस्यांमध्ये तुंबळ हाणामारी होऊन कपडे फाडण्यापर्यंत मजल गेली. या घटनेनंतर भाजपच्या 5 आमदारांना निलंबित करण्यात आले आहे.

बीरभूम हिसांचाराच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केली…

पश्चिम बंगाल विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बीरभूम हिसांचाराच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केल्यावर तृणमूल काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले यानंतर भाजप आणि टीएसमी आमदारांमध्ये भांडण झाले. इतकेच नव्हे तर आमदारांनी भांडणामध्ये एकमेकांचे कपडेही फाडले. गदारोळानंतर भाजप आमदारांनी सभा त्याग केला. या हाणामारीत टीएमसी आमदार असित मजुमदार यांच्या नाकाला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. मजुमदार यांना एसएसकेएममध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहे. या घटनेनंतर भाजपच्या पाच आमदारांना निलंबित करण्यात आले असून यामध्ये शुभेंदू अधिकारी, मनोज तिग्गा, शंकर घोष, दीपक बर्मन आणि नरहरी महतो यांचा समावेश आहे. यादरम्यान भाजप आमदार मनोज तिग्गा यांना मारहाण करण्यात आली.

बघा व्हिडिओ

धक्काबुक्की करत फाडले त्यांचे कपडे 

बीरभूम हिंसाचार प्रकरणी भाजपने सभागृहात चर्चेची मागणी केली आणि त्यानंतर विरोध सुरू झाला. यानंतर सभागृहातील परिस्थिती बिघडली आणि दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुरू झाली. यानंतर भाजप आमदारांनीही विधानसभेबाहेर निदर्शने केली. सभागृहात निषेधादरम्यान सुरक्षा रक्षकांनी आपल्यावर हल्ला केला आणि ढकलले, असा आरोप भाजप आमदारांनी केला आहे. भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी सांगितले की, भाजप आमदारांना धक्काबुक्की करण्यात आली आणि त्यांचे कपडे फाडण्यात आले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.