काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर निवडणुकीत परकीय चलन व अनेक आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉइनचा (Bitcoin Scams) वापर केला आहे, असे आरोप पुण्यातील माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील (Ravindra Patil) यांनी केले आहे. भाजपा खासदार व प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी मंगळवार, १९ नोव्हेंबरच्या रात्री पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले आणि यासंबंधीचे कथित पुरावे म्हणून काही कॉल रेकॉर्डिंग्स आणि व्हॉट्सअॅप चॅट्सचे स्क्रीनशॉट सादर केले आहेत.
(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024: मनसेचं इंजिन नक्कीच जोरदार धावेल; Amit Thackeray यांनी व्यक्त केला विश्वास)
रवींद्र पाटील यांनी ऐकवलेल्या क्लिपमध्ये सुप्रिया सुळे आणि गौरव मेहता यांचे संभाषण स्पष्टपणे ऐकू येत आहे. त्रिवेदी यांनी ऐकवलेल्या ऑडिओमध्ये केवळ सुप्रिया सुळे यांचा आवाज ऐकू येत आहे.
काय आहे ऑडिओ क्लिपमध्ये?
“Need cash in exchange of bitcoins…You need not to worry about inquiry… We will handle it when we come to power…”
NCP (Sharad Pawar) leader Supriya Sule to Gaurav Mehta, the employee of audit firm Sarathi Associates.
(3 voice notes) pic.twitter.com/Pulphd6Oki
— BJP (@BJP4India) November 19, 2024
‘तुम्ही सर्व बिटकॉईन काढून कॅश का घेत नाही? सध्याच्या किंमती अनुकूल आहेत. निवडणुका जवळ आहेत, त्यामुळे आम्हाला मोठा निधी लागणार आहे. चौकशीबद्दल घाबरू नका, आमचं सरकार आल्यानंतर ते हाताळू. फक्त ते पूर्ण करा.’
‘गौरव काय चाललं आहे? तुम्ही कुणीही प्रतिक्रिया देत नाही. माझ्यासोबत खेळ खेळू नका. गुप्ता गायब आहे, मग पैशांचं काय झालं? तो म्हणाला सगळे बिटकॉईन आणि कॅश तुमच्याकडे आहे. मला लगेच फोन कर, आम्हाला पैशांची गरज आहे. निवडणुका सुरू आहेत’
‘गौरव तू आम्हाला उत्तर का देत नाहीयेस? आम्हाला पहिले पैसे हवे आहेत’, असे सुप्रिया सुळे या क्लिपमध्ये बोलतांना ऐकायला मिळत आहे.
सुप्रिया सुळे ज्याच्याशी बोलल्या, तो गौरव मेहता कोण आहे ?
या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार गौरव मेहता या ऑडिट फर्मचा कर्मचारी असून, त्याने गेल्या काही दिवसांत अनेकदा संपर्क साधला होता. पाटील यांनी प्रतिसाद दिला, तेव्हा मेहता यांनी सन २०१८ च्या क्रिप्टोकरन्सी फसवणुकीच्या तपासाविषयी माहिती शेअर केली. मेहता यांनी आरोप केला की, क्रिप्टोकरन्सी व्यापारी अमित भारद्वाजच्या अटकेदरम्यान बिटकॉइन (Bitcoin Scams) असलेले हार्डवेअर वॉलेट जप्त करण्यात आले. परंतु, पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या सूचनेवरून हे वॉलेट बदलण्यात आल्याचा दावा मेहता यांनी केला. त्यामुळे रवींद्र पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आल्याचा दावा मेहता यांनी केला. खरे गुन्हेगार गुप्ता आणि त्यांची टीम असल्याचा दावाही करण्यात आला आहे. तसेच या घोटाळ्यात सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांची नावे घेतल्याचा आरोपही पाटील यांनी मेहता यांच्यावर केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community